Uncategorized

विडी व यंत्रमाग कामगारांच्या पाल्यांनी शिक्षणात भरारी घ्यावी.

सोलापूर प्रतिनिधी विष्णू कारमपुरी (महाराज)


सो.दि.25/6/25 :- गरीब विडी व यंत्रमाग कामगारांच्या मुला-मुलींनी शिक्षणात उंत्तुग भरारी घेऊन आई-वडिलांचे स्वप्न साकार करावे असे आव्हान महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विडी व यंत्रमाग कामगारांच्या पाल्यांना वह्या व शालेय साहित्याचे वाटप कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना केले.
महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने गरीब विडी व यंत्रमाग कामगार सेनेच्या मुला मुलींना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम कुंभारी येथील मा साहेब घरकुल वसाहातातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहात विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या अध्यक्षतेखाली व सेक्रेटरी श्रीनिवास चिलवेरी यांच्या शुभहस्ते आणि कामगार सेनेचे प्रसिद्धीप्रमुख रेखा आडकी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला प्रारंभी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व मा साहेब मीनाताई ठाकरे मुर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

सदर प्रसंगी वरील मान्यवरांसह प्रशांत जक्का , नरेश अन्नलदास , गुरुनाथ कोळी , श्रीनिवास बोगा , यांच्यासह घरकुल वसाहतीत माता-भगिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

फोटोमॅटर – महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने गरीब विडी व यंत्रमाग कामगारांच्या मुला-मुलींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले सदर प्रसंगी विडी कामगार माता-भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी व विष्णू कारमपुरी महाराज श्रीनिवास चिलवेरी रेखा आडकी इतर मान्यवर दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!