Uncategorized

पोलीस स्टेशन पोफाळी हद्दीत घडलेल्या स्कूल बस अपघाताच्या अनुषंगाने

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

पोफाळी:-पोलीस स्टेशन आज दि. 27/01/2025 रोजी चे सकाळी 11:00 वा. ते 13:00 वाजता पावेतो मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब उमरखेड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन पोफाळी हद्दीत चालणारे सर्व स्कूल बसेस चे चालक-मालक, प्रवासी वाहतूक करणारे क्रूझर गाड्यांचे चालक-मालक, प्रवासी वाहतूक करणारे ऑटो चालक- मालक यांची बैठक घेतली, बैठकी करिता RTO ऑफिस चे 03 अधिकारी यांना आमंत्रित केले होतें, उपस्थित सर्व प्रवासी, स्कूल बस चे चालक मालक यांना आपल्या वाहणाचे संपूर्ण कागदपत्रे update करून काढुन

घेण्याबाबत, सर्व चालकांकडे आपले मुदतीत असलेले लायसन्स पाहिजे, चालक हा स्वच्छ प्रतिमेचा दारू पिणारा नसावा, चालकाचे चारित्र्य प्रमाणपत्र काढुन घेण्याबाबत, शमतेपेक्षा अधिक प्रवासी, विध्यार्थी नेण्यात येऊ नये, स्कूल बस वाहणात मुलांचा सांभाळ करण्यासाठी महिला कर्मचारी/ सुरक्षापुरुष नेमण्यात यावा, first aid box असावा, fire extinguisher असावे, पोस्टे हद्दीत चालत असलेल्या सर्व वाहणाची कागदपत्रे xerox प्रती पोलीस स्टेशन ला तात्काळ जमा कराव्यात, प्रवासी वाहणाला लोम्बकळत नेऊ नये, प्रवासादरम्यान असहाय्य महिलेला, वृद्धाना, बालकांना मदत करणे, अपघातग्रस्त जखमी व्यक्तीला दवाखान्यात पोहचून मदत करणे, प्रवाशांचे हरविलेले पर्स, साहित्य प्रामाणिकपणे

परत करणे, कुठलीही संशयित व्यक्ती बद्दल पोलीस स्टेशन ला तात्काळ माहिती देणे याबाबत सूचना देऊन विनपरवाना, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास कायदेशिर कडक कारवाई करणार असल्याबाबत सांगून सक्त ताकीद देण्यात आली. बैठकीकरिता हद्दीतील 130 ते 140 चालक मालक मोठ्या संख्येने हजर होते.
माहितीस सादर आहे.

  • सपोनि पंकज दाभाडे,
    PSO पोफाळी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!