Uncategorized

प्रजासत्ताकदिनानिमित्त उमरखेड तहसिल कार्यालयात ध्वाजोहण

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड, दि.27 (उमाका) : भारतीय प्रजासत्ताकाच्या 75 व्या वर्धापण दिनानिमित्त उपविभागीय आधिकारी सखाराम मुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी आमदार किसन वानखडे, तहसिलदार आर. यु. सुरुडकर. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.गायकवाड, पोलिस निरिक्षक श्री.पांचाळ, नितीन भुतडा, माजी आमदार विजय खडसे तसेच विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उमरखेड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांना प्रत्येकी 1 लाख रुपयाच्या मदतीचे वितरण करण्यात आले. एकून 5 लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले. अंत्योदय सिधापत्रिकाधारक 24 लाभार्थ्यांना पत्रिकेचे वाटप करण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेच्या एकून 188 लाभार्थींना लाभ मिळाला असून त्यापैकी 15 जणाना यावेळी वाटप करण्यात आले.

श्रावणबाळ सेवा योजनेच्या 301 लाभार्थ्यांना लाभ मंजूर झाला असून त्यापैकी यावेळी 12 लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले तसेच विदर्भातील जिल्ह्यांच्या तालुक्यांचे दिड मिनीटात नावे सांगण्याचा विक्रम करणारा विद्यार्थी अनिकेत

पांडे याचा दुचाकी सायकल व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!