Uncategorized

कृषी महाविद्यालय उमरखेड द्वारे माजी विद्यार्थी संमेलन व बँकिंग शेत्रा मध्ये नोकरी विषयक मार्गदर्शन शिबिर.

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत उमरखेड येतील कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थ्यांचे संमेलन व ॲक्सिस बँके करिता नोकरी विषयक विशेष मार्गदर्शन शिबिर उमरखेड येथील राजस्थानी भवन येथे दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमांमध्ये कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी व श्री विठ्ठल रुक्मिणी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, सवना येथील माजी विद्यार्थ्यांनी आणि उमरखेड परिसरातील पदवी प्राप्त विद्यार्थांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एम. खान तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक राम पांडे यांची उपस्थितीत तसेच राजस्थान येथील NIIT निमराणा एरिया मॅनेजर मनोहर घोष यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रम चे प्रास्ताविक प्राध्यापक एस. के. चिंतले यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना ॲक्सिस बँकेमध्ये असणाऱ्या रोजगाराच्या संधी व त्यासाठी करावयाची तयारी या संदर्भात मार्गदर्शन करून इच्छुक विद्यार्थ्यांकडून नोंदणी करून घेण्यात आली. या वेळी भविष्यात बँकिंग क्षेत्रा मध्ये संधी उपलब्ध होणार असून, येत्या दोन वर्षात केवळ एक्सेस बँकेला किमान दहा हजार कर्मचाऱ्यांची गरज लागणार असल्याचे श्री पांडे यांनी सांगितले तर आपल्या भागातून किमान एक हजार विद्यार्थी तरी या संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान यावेळी करण्यात आले. आजच्या युगात केवळ शिक्षण पूर्ण करणे किंवा पदवी प्रमाणपत्रा पुरते शिक्षण घेणे हे केवळ आपल्या नौकरी साठी 50% फायद्याचे असून नौकरी मिळण्याकरिता आपल्या अंगी असणारे कौशल्य गुणांचा याकरिता 50% फायदा होऊ शकतो तसेच बँकिंग क्षेत्राचे बदलते स्वरूप व त्यास विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने सामोरे जावे या संदर्भातही श्री राम पांडे यांच्या तर्फे विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाकरिता महागाव उमरखेड विभागातील विद्यार्थ्यांनी देखील प्रतिसाद नोंदविला. या वर्षी कृषी महाविद्यालयातील मुलाखती साठी गेलेल्या पाच विद्यार्त्यान पैकी तीन विद्यार्थीनची ॲक्सिस बँकेच्या असिस्टंट मॅनेजर पदी निवड झालेली असल्यामुळे बेरोजगार पदवी धारक युवकांना नौकरी ची संधी उपलब्ध होण्यासाठी कृषी महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. विजयराव माने यांच्या प्रयत्नाने माजी विद्यार्थी संमेलन व ॲक्सिस बँके मध्ये नोकरी विषयक मार्गदर्शन शिबिर पार पडले, या कार्यशाळेसाठी या भागातील सर्वच पदवी धारक बेरोजगार युवकांना मोफत प्रवेश देण्याची संधी डॉ. माने यांनी दिली असल्याने अनेक पदवीधारक युवकांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला, या नंतर सर्व नोंदणी झालेले पदवीधारक या यंत्रणेच्या संपर्कात राहून बँकिंग कार्यप्रणाली च्या होणाऱ्या वेगवेगळ्या टप्प्यातून यांना यशस्वी मार्गक्रमण करण्यासाठी वेळोवेळी काउन्सलिंग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कृषि महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक श्री. तुषार चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सहाय्यक प्राध्यापक वाकोडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी महाविद्यालयाचा संपूर्ण कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!