नगरपंचायत हिमायतनगर अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना मधील प्रथम DPR ची रखडलेली उर्वरित लाभार्थ्याची मंजूर अनुदानाची रक्कम तात्काळ मंजूर करून देण्यात यावी:-

माजी उपनगर अध्यक्ष मोहम्मद जाविद
महाड़ा मुंबई च्या मुख्य अभियंता ला दिले निवेदन
अजिम हिंदुस्तान
प्रतिनिधी। हिमायतनगर
हिमायतनगर नगर पंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत प्रथम DPR सन 2018 मध्ये ऐकून 1215 लाभारत्यांचे घरकुल मंजूर होऊन त्यामधील जवळपास 90% काम पूर्ण झाले आहे केंद्र शासन स्तरावरुन 18 कोटि 22 लाख 50 हजार इतकी रक्कम येणे अपेक्षित होती परंतु केंद्र शासनाने सन 2019 ला 6 कोटि 60 लाख 60 हजार रूपये निधी प्राप्त झालेला आहे,
व उर्वरित रक्कम 11 कोटि 62 लाख रूपये अद्याप पर्यंत केंद्र शासना कडून हिमायतनगर नगर पंचायत ला निधी प्राप्त झालेला नाही,
त्या कारणाने लाभार्त्यांना शेवट चा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही,हिमायतनगर शहरात घरकुल लाभारती हे अत्यंत गरीब असून, त्यांना शेवटचा हप्ता न मिळाल्याने हवालदिल झाले आहे,,
घरकुल लाभार्त्यांना शेवटचा हप्ता त्वरित मिळवून द्यावे असा निवेदन हिमायतनगर नगर पंचायत चे माजी उपनगर अध्यक्ष मोहम्मद जाविद यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रीय प्राधिकरण महाड़ा मुंबई च्या मुख्य अभियंता शिवकुमार आड़े यांना देऊन विनंती केली आहे,
मोहम्मद जाविद हे वेळो वेळी गोरगरीब लोकांना न्याय मिळून देण्याच्या प्रयत्न करीत असतात
ते नेहमी आम जनतेच्या प्रश्नावर लक्ष देऊन जनतेचा काम करुन घेऊन त्यानां मदद करण्याच्या प्रयत्न करत असल्यामुळे जनतेच्या मनात त्यांची ख्याती प्रतिष्ठा निर्माण होत आहे,