निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये द्या

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798606192
उबाठा सेनेचे जिल्हा समन्वयक संजय पळसकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
उमरखेड :-विधानसभा निवडणुकीत सहजरीत्या यश मिळविण्याच्या उद्देशाने महायुतीकडून लाडक्या बहिणींना डिसेंबर 2024 नंतर 1500 ऐवजी दरमहा 2100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती .विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर विद्यमान सरकारला आपल्या आश्वासनाचा विसर पडला असल्याने लाडक्या बहिणींची घोर निराशा होत आहे .निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करूनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीआश्वासनाची तत्काळ अंमलबजावणी करावी ,अशी मागणी उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे .
2024 च्या विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यास लाडक्या बहिणींना 2100 रुपये दरमहा देणार असल्याची घोषणा महायुती तर्फे करण्यात आली होती .विधानसभा निवडणुकीत या आश्वासनामुळे लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पदरात झुकते माप टाकले व महायुतीला सत्तेवर आणले . 31डिसेंबर नंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये दरमहा मानधन सुरू

करण्यात येईल हे आश्वासन आता हवेत विरले की काय असा प्रश्न सर्वसामान्य लाडक्या बहिणी विचारत आहेत .विद्यमान सरकारने आपल्या आश्वासनावर ठाम राहून लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये मानधन देण्याची तत्काळ अंमलबजावणी करावी अशा आशयाचे निवेदन शिवसेना उबाठा गटाचे यवतमाळ जिल्हा समन्वयक संजय पळसकर (पलये )यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत पाठविले आहे .