Uncategorized

अवैध रेती व्यवसायाला परिसरातील राजकीय पुढार्‍यांचेअभय? महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांचे रेती माफीयांशी लागेबांधे?

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड तालुक्यात तर निवडणुकीदरम्यान अवैध पैसा शहरात व तालुक्यात येऊ नये म्हणून चेक पोस्ट व्हायला पाहिजे होते परंतु निवडणूक लागल्यानंतरही संबंधित विभागाने चेक पोस्ट केले नव्हते त्याबाबत जयराज सिंहासननी आपल्या वृत्तातून आवाज उठवल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन काही रस्त्यावर चेक पोस्ट केले आहेत महाराष्ट्रातील व तालुक्यातील चेक पोस्टवर पुढाऱ्यांच्या व सर्वसामान्य लोकांच्या गाड्या वाहने चेक होतात परंतु त्याच रस्त्यावरून अवैध रेती व अवैध गौण खनिज घेऊन जाणारे वाहने मात्र चेक केल्या जात नाही ही फार मोठी शोकांतिका आहे याकडे प्रामुख्याने महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आरटीओ प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करायला पाहिजे याची दखल निवडणूक अधिकाऱ्याने घेणे गरजेचे आहे सर्वसामान्यांना घर बांधकाम करण्यासाठी अवाच्या सव्वा भावाने रेती विकणारे अवैध रेती व्यवसायीक यांच्यावर राजकीय नेत्याचा देखील वरदहस्त आहे तालुक्यातील व मुळावा परिसरातील काही दिग्गज समजल्या जाणाऱ्या नेत्यांच्या नातेवाईकांचा व काही कार्यकर्त्यांचा अवैध रेतीचा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे गावकऱ्यात बोलल्या जात आहे अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्याचे काम प्रशासनाचे असून लोकप्रतिनिधींनी त्यांना मदत करायची असते परंतु लोकप्रतिनिधीचे मुलं व नातेवाईक किंवा कार्यकर्ते टिप्पर द्वारे व इतर वाहनाद्वारे अवैधरेतीचा धंदा करीत असतील तर त्यांना कोण अडवणार आहे? कारण संबंधित शासकीय विभागातील काही अवैध रेतीव्यवसायाला पाठबळ देणाऱ्या पुढार्‍याच्या आशीर्वादाने काही कर्मचारी देखील या व्यवसायामध्ये गुंतले आहेत उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयातही अशा कर्मचाऱ्यांचे व रेतीव्यवसायिकाचे लागेबांधे असल्याचे बोलल्या जात आहे उपविभागीय अधिकाऱ्यांची अशा कर्मचाऱ्याकडून दिशाभूल केल्या जात आहे त्याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे अवैध रेती व्यवसायाला खतपाणी घालणाऱ्या अशा “होम तहसील मधील दीपकांची” मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी त्याची तिथून बदली करणे जरुरी आहे याची दखल निवडणूक अधिकारी यांनी घेणे आवश्यक आहे एकूणच कुंपणच शेत खाते” असे म्हटल्यास वावगे ठरू नये

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!