शेंबाळ पिंपरी बस्थानक बनले घाणीचे साम्राज्यपुसद आगार व्यवस्थापक यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
काही आंतर असलेले शेंबाळ पिंपरी बसस्थानक परिसरात घाणीने विळखा घातला आहे.विदर्भ मराठवाडा सीमेवर असलेल्या शेंबाळ पिंपरी बस्थानकामध्ये अवैध वाहतूक धुमाकुळ घालत आहेच पण
शेंबाळ पिंपरी बसस्थानक मध्ये अस्वच्छतेने कळस गाठले आहे येथील महीला मुत्रीघर अस्वच्छ असल्यामुळे महिलांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे.तसेच बस्थानक घाणीचे साम्राज्याने ग्रासले असून यामुळे डासांची उपत्ती होऊन प्रवाश्याना आजारा ला तोंड द्यावे लागत आहे.तसेच बस्थानकात पाणी पिण्याची सोय नसल्याने प्रवाशांना दहा वीस रुपयांची बाटल विकत घ्यावे लागत असल्यामुळे प्रवाशांना आर्थिक उदंड बसत आहे.
पुसदचे आगार व्यवस्थापक याकडे पुर्ण: ता जाणूनबुजून दुर्लक्ष करून हुकुमशाही पद्धतीने सरकारी वेतन लाटत आहे.विभागीय कार्यालय मुग गिळुन बसले असून नव्यानेच रुजु झालेले विभाग नियंत्रक कछवे ,व वाहतुक अधिकारी दराडे यावर काय कारवाई करणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.