Uncategorized

फुलसावंगी येथील बोगस एन .ए.पी.34-झालेले फेरफार अखेर रद्द!


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे


महागाव तालुक्यात प्रभारी तहसीलदार जी.एम .राठोड यांनी अधिकार नसताना उपविभागीय अधिकारी यांचे पावर वापरून 25 जानेवारी 24 रोजी रा.मा.क्र/३/एन.ए.पी-34(42-ड) 2025, व रा. मा. क्र./ 05/एन.ए.पी-34/2024 दोन ऑर्डर एकाच दिवशी फुलसांगी येथील श्रीमती प्रियाली प्रकाश चिंतावार यांच्या शेताचे क्षेत्रफळ 5.04 संपूर्ण क्षेत्रफळाचे नगर विकास रचनाची परवानगी न घेता ,जाहिरात प्रकाशित न करता ,वर्ग एक गाव असलेले जे की तहसीलदार यांच्या अधिपत्याखाली येत नसून त्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली असलेले पावर वर्ग 1 गावाचे एन.ए.पी ऑर्डर केले होते ते बेकायदेशीर असल्यामुळे उपविभागीय अधिकारी साहेब मुळे यांनी दिनांक 22 5 2024 रोजी दोन्हीही एन ए पी बेकायदेशीर ठरू रद्द केले परंतु रद्द झालेल्या एन. ए. पी.34 ऑर्डर झाल्यावर तलाठी व मंडल अधिकारी यांनी घेतलेले फेरफार व सातबारे रद्द न केल्यामुळे दैनिक महासागर येथे बातमी प्रकाशित होताच व लेखी तक्रारीवरून एक वर्षानंतर 29- 5 -25 रोजी उपविभागीय अधिकारी उमरखेड यांनी मंडल अधिकारी फुलसावंगी व ग्राम महसूल अधिकारी फुलसांगी यांना पत्र देऊन एन ए पी चे फेरफार रद्द तुकडे पडलेले सातबारा संपूर्ण रद्द करून जैसे थे तसा सातबारा करण्याचे आदेश पारित केले.परंतु मंडल अधिकारी राम पंडित व तलाठी शेख यांना विचारणा केली असता संपूर्ण प्लॉटचे फेरफार रद्द करून संपूर्ण सातबारा एक करावा लागतो याकरता उशीर लागत आहे.प्रोसेस सुरू आहे .अशी प्रतिक्रिया त्यांनी आज आमच्या प्रतिनिधी जवळ दिली अखेर एक वर्षानंतर बोगस झालेले एन.ए.पी व सातबारे उपविभागीय अधिकारी यांनी बेकायदेशीर ठरवून रद्द केले.त्यामुळे लेआउट धारकांचे धाबे दणाणले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!