10 जानेवारी रोजी भाऊसाहेब माने समाज भूषण पुरस्काराचे वितरण विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा होणार गौरव

सहसंपादक शेख मुजाहिद मो. 7798306192
उमरखेड :तालुक्यातील आपापल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व सामाजिक संस्थेचा महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त भाऊसाहेब माने गौरव कृती समिती तर्फे सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते .यावर्षी सुद्धा 10 जानेवारी रोजी जिजाऊ सांस्कृतिक भवन येथे आठ व्यक्ती व सामाजिक संस्थेचा समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात येणार आहे स्व. जेठमलजी माहेश्वरी व स्व . बंकटलाल भुतडा यांच्या स्मृति प्रित्यर्थ क्रीडा क्षेत्रामध्ये योगदान देणारे सतीश मुडे, स्व . देवराव पाटील चोंढीकर व स्व . विठ्ठलराव देशमुख सवनेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद, स्व . नारायणराव शिलार व स्व . नारायणराव वानखेडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे संभाजी भोयर, स्व.रामचंद्र सिंगनकर व मरहूम अमानुल्ला जहागीरदार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्था उमरखेड, स्व . वामनराव उत्तरवार व स्व . गुलाबसिंग ठाकूर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिव्यांग उद्योजक प्रशांत सराफ, स्व . सखाराम नरवाडे गुरुजी व स्व . सखाराम मुडे गुरुजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नागेश मिरासे जिल्हा परिषद शाळा विडूळ, स्व . भाई केशवराव देवसरकर व स्व .परसराम पिलवंड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महिला सशक्तिकरण कार्य करणाऱ्या रविता लकडे पो फाळी, स्व . नानासाहेब देशमुख व स्व . भास्करअण्णा गोविंदवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उत्कृष्ट रेशीम शेती करणारे सुशील मुधळे यांना समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे तरी तालुक्यातील रसिक बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन भाऊसाहेब माने गौरव कृती समितीचे मुख्य मार्गदर्शक डॉ. विजयराव माने, समितीचे अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी,सचिव बालाजी वानखेडे,कार्याध्यक्ष अविनाश चंद्रवंशी, देवानंद पाटील मोरे अध्यक्ष शेतकरी कष्टकरी संघ शुभम माने, व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे
चौकट
तालुक्यात होउण गेलेल्या महान समाज सुधारक,लोकनेत्यांचा आदर्श व त्यांनी केलेल्या समाजउपयोगी कार्याचा आदर्श समाजापुढे उभा रहावा व त्यांनी केलेल्या अखंडीत समाज कार्याची प्रेरणा घेऊन वाटचाल करीत असलेल्यांचा सन्मान व्हावा या हेतुने भाऊसाहेब माने प्रतीष्ठानाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. विजयराव माने यांच्या संकल्पनेतुन स्व . भाऊसाहेब माने समाज भूषण पुरस्काराचे आयोजन करण्यात येते
=====================



