Uncategorized

अवैध मटक्याच्या नादाने अजून किती जणांचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार ?

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192

ढाणकी : शहर सद्यस्थितीत
अवैध धंद्याचे माहेरघर बनले असून, कालच येथील अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एका निष्पाप जीवाचा बळी गेला. शहरात होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीचे मुख्य कारण म्हणजे, शहरात सुरू असलेला खुलेआम मटका. यामुळे गाव खेड्याच्या लोकांची मटका लावण्यासाठी शहरात दिवसेंदिवस होणारी गर्दी आणि या गर्दीमुळे मुख्य

चौकात उडणारी वर्दळ, तसेच या गर्दीला वाहून नेण्या आणण्यासाठी होणारी अवैध प्रवासी वाहतूक, याचा फटका निष्पाप नागरिकांना बसत आहे हे कालच्या घटनेतून दिसते. अजून असे किती निष्पाप
बळी गेल्यानंतर संबंधित पोलीस प्रशासनाला जाग येणार ? आता तरी शहरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध मटक्यावर पोलीस प्रशासन लगाम कसणार का? पोलीस अधीक्षक महोदय याकडे गांभीयनि लक्ष देऊन ढाणकी शहरात सुरू असलेले अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करणार का? शहरातील अवैध वाहतूक कायमस्वरूपी बंद होणार का? आणि निष्पाप जीवाचे बळी घेणारा मटका शहरातून हद्दपार होणार का? याकडे ढाणकीवासियांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!