Uncategorized

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको…किमान 10 जूनपर्यंत पावसात घट


प्रतिनिधी संजय नागरगोजे


Rainfall Decrease till 10 June : बदलेलेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या (Monsoon) प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली. आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातील काही इतर किरकोळ भागात प्रामुख्याने हलका पाऊस पडण्याचा (Maharashtra Rain) अंदाज आहे. राज्यातील बहुतांश भागात मात्र कोरडे हवामान अपेक्षित आहे, ज्यामुळे कमाल तापमानात वाढ होईल.

कृषी विभागाचं आवाहन

विदर्भात 40 अंशापर्यंत कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे तर मराठवाडा आणि खानदेशात (Rain Update) कमाल तापमान 35 ते 40 अंशामध्ये राहील. या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर पडण्याची शक्यता आहे. कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई (Sowing) करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून परत एकदा करण्यात येत आहे.

पेरणीची घाई केल्यास…

अनेकदा पुरेसा पाऊस होण्याअगोदरच शेतकरी पेरणीची घाई करतो, नंतर पावसाने उघड दिल्यावर शेतकऱ्याला मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतं. घाईगडबड आणि बोगस बियाणे आणि खतं, यामुळेही शेतकऱ्यांना फटका बसतो. पेरणी वाया गेल्यास काही वेळा हंगाम वाया जातो. त्यामुळे पेरणी करताना शेतकऱ्यांनी जागरूकता दाखविल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. शेतकऱ्यांना होणारे नुकसान टाळता येवू शकते.

शेतकऱ्यांनीपेरणी करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी?

शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात करताना जमिनीतील ओलावा तपासणे खूप गरजेचे ठरते. बियाण्याच्या वाणाची निवड करूनपेरणी करताना बियाणे दोन ते तीन सेंमीपेक्षा जास्त बियाणे खाली जाणार नाही, याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. बियाणे अधिक खोल गेल्यानंतर जोराने पाऊस आल्यास पिकाच्या उगवण क्षमतेवर परिणाम होतो. याचबरोबर पेरणी करताना पिकांची निवड अन् पेरणीच्या काळाचं नियोजन करणं देखील गरजेचं आहे. यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन यासारखी कमी काळाची पिके सुरुवातीला पेरली गेली पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button