Uncategorized

महा पोलीस न्यूज च्या यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी पदी भागाजी शिवरतवाड यांची निवड

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192


उमरखेड बऱ्याच वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून आपल्या निःस्वार्थ आणि परखड कार्यशैलीमुळे समाजमनावर आपला ठसा उमटवणारे एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या भागाजी शिवरतवाड यांनी जनतेच्या प्रश्नांना शासन-प्रशासनाच्या दरबारात पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य जे समर्पणाने केले, त्याचा परिणाम म्हणून आज अनेक सामान्य नागरिक त्यांना आपला विश्वासू प्रतिनिधी मानतात.

त्यांच्या पत्रकारितेतील निस्वार्थ कार्य, निर्भीडतेने प्रश्न मांडण्याची शैली आणि जनतेसाठी त्यांनी केलेले उल्लेखनीय योगदान पाहता, महा पोलिस न्यूज चे संपादक श्री पंकेश जाधव पुणे यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना यवतमाळ चिफ ब्युरो पदाची जबाबदारी सोपवली. हे केवळ एक पद नाही, तर त्यांच्या कार्याला मिळालेला मोठा सन्मान आहे.

या निवडीबद्दल यवतमाळ जिल्ह्यातून अनेक प्रशासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी आणि पत्रकार बंधू, राजकीय मंडळींनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!