शहर

महागाव नगरपंचायतीत काँग्रेसचा व्हीप जारी नगराध्यक्ष निवडीसाठी सौ. रुपाली कोल्हेकर अधिकृत उमेदवार


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायत येथे २७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या नगराध्यक्ष निवडीच्या विशेष सभेसाठी Indian National Congress पक्षाच्या वतीने पक्षादेश (व्हीप) जारी करण्यात आला आहे. काँग्रेसचे गटनेते श्री. शैलेशकुमार दिलीपराव सुरोशे यांनी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी हा व्हीप काढला.
नगराध्यक्ष निवडीसंदर्भात नगरपंचायत कार्यालयात विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विषयाचे गांभीर्य लक्षात घेता काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी सभेला अनिवार्य उपस्थित राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रफुल मानकर यांच्या आदेशानुसार काँग्रेसकडून महागाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी सौ. रुपाली संतोष कोल्हेकर यांची अधिकृत उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. सभेदरम्यान त्यांच्या बाजूने हात उंच करून मतदान करावे, असे स्पष्ट निर्देश व्हीपमध्ये नमूद आहेत.
तसेच कोणत्याही परिस्थितीत पक्षाच्या निर्देशाविरुद्ध मतदान करू नये किंवा अनुपस्थित राहू नये, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. पक्षादेशाचे उल्लंघन करणाऱ्या सदस्यांविरुद्ध Maharashtra Local Authority Members Disqualification Act, 1986 अन्वये कारवाई करून अपात्र ठरविण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या राजकीय घडामोडींमुळे नगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर महागाव नगरपंचायतीतील राजकीय हालचालींना वेग आला असून येणाऱ्या विशेष सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button