रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद!

सहसंपादक शेख मुजाहिद
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, उमरखेड शहर यांच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात व यशस्वीरित्या संपन्न झाले.
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या उदात्त भावनेतून युवक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्याच्या या अमूल्य योगदानातून अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळणार असून, समाजाप्रती असलेली संवेदनशीलता आणि सेवाभाव या उपक्रमातून अधोरेखित झाला.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टी पुसद जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष अध्यक्षा आरतीताई फुफाटे, मा. आमदार श्री. उत्तमराव इंगळे साहेब, मा. आमदार श्री. नामदेवराव ससाणे साहेब, भाजपा शहराध्यक्ष तथा उमरखेड विधानसभेचे युवा नेतृत्व श्री. अतुलभाऊ खंदारे, माजी नगराध्यक्ष श्री. बालाजीअण्णा उदावंत, माजी सभापती श्री. दिलीप सुरते, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सुदर्शन पाटील रावते, जिल्हा महामंत्री आदित्य माने, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित वर्मा, माजी शहराध्यक्ष अजयजी बेदरकर, मा. तालुकाध्यक्ष सुनील टाक, संजय भंडारे, परमानंद कदम, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष पवन मेंढे, सुशांत भराडे, न.प. गटनेते विजय हरडफकर, नगरसेविका करुणाताई कुबडे, ज्योत्स्नाताई रुडे, अमोल तिवरंगकर, गोपाल कलाने, ढाणकी न.प. गटनेते मल्हार चंद्रे, महिला मोर्चा ग्रामीण अध्यक्षा आशाताई देवसरकर, शहराध्यक्षा सौ. शीतल धोंगडे, तसेच शिवाजी रावते, रणजीत रणमले, धनराज वानखडे, संतोष पवार, दशरथ राठोड, दत्ता काळे, शेवंतराव गायकवाड, गजानन जगताप, बबलू मैड, श्याम कंठे, धनंजय माने, आदित्य शिंदे, कैलास उदावंत, शैलेश मुंगे, विनोद मेसरे, दिनेश भंडारी, भगवानराव इंगळे, गोपाल उदावंत, सचिन यशवंत, गोविंद सोमाणी, विशाल कदम, सुनील अनखुळे, श्री. उल्लंगवार, महावीर महाजन, शेखर तिवरंगकर, कृष्णा साबळे, प्रसाद पत्रे, रोहित चिकणे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
यावेळी स्पंदन ब्लड बँकेचे व्यवस्थापक श्री. बालाजी चिंचोलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तसंकलनाची जबाबदारी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडत मोलाचे सहकार्य केले.
समाजहित, मानवसेवा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा रक्तदानाचा उपक्रम उमरखेड शहरासाठी प्रेरणादायी ठरला. रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि कार्यकर्त्यांचे उत्कृष्ट नियोजन यामुळे हा सेवाभावी उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.



