Uncategorized

श्रीमंताच्या दारात समस्या असती तर नगरसेवकांची रांग लागली असती! हिमायतनगर नगर पंचायतीचा लाजीरवाणा कारभार, प्रभाग १३ मधील गरिबांच्या त्रासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष!


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): नागरी सुविधा पुरवण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या नगर पंचायत प्रशासनाचा आणि स्थानिक नगरसेवकाचा बेफिकिर कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. प्रभाग क्रमांक १३ मधील शेख अमीन भाई यांच्या घरासमोरील गल्लीत रस्त्याचे अत्यंत चुकीचे बांधकाम केल्यामुळे संपूर्ण रस्त्यावर दुर्गंधीयुक्त सांडपाणी अन् चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
​या भेदभावपूर्ण भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करताना स्थानिक रहिवासी शेख अमीन भाई म्हणाले की, “आम्ही गरीब आहोत म्हणूनच आमच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे का? हाच प्रकार जर एखाद्या श्रीमंत किंवा बड्या हस्तियांच्या घरासमोर झाला असता, तर आज इथे प्रशासकीय अधिकाऱ्यांची रांग लागली असती! पण गरिबांच्या आरोग्याची धुळधाण उडवताना कोणालाच काही वाटत नाही.”
​गल्लीच्या दोन्ही बाजूंचे रस्ते उंच आणि मधला भाग खोलगट ठेवल्याने सांडपाणी बाहेर जाण्यास कोणतीही वाट उरलेली नाही. या साचलेल्या घाणेरड्या चिखलातून रोज ये-जा करावी लागत असल्याने नागरिकांना आणि लहान मुलांच्या पायांना ॲलर्जी, खाज आणि संसर्ग होत आहेत. रस्त्याचे काम करताना योग्य लेव्हल आणि ड्रेनेजचे नियोजन का केले नाही? सर्वसामान्यांना चिखलात ढकलणाऱ्या या निष्काळजी कारभारावर उत्तरदायित्व निश्चित होणार का? असा थेट सवाल नागरिक विचारत असून नगर पंचायत प्रशासनाने तात्काळ या समस्येचा निपटारा करून रस्ता दुरुस्त करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button