Uncategorized

हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाट्यावर भरधाव कारच्या भीषण धडकेत एकाचा दुर्दैवी मृत्यू तर एक गंभीर; गुपचुपचा गाडाही चकणाचूर!


​’जनतेचा जीव मौल्यवान’ म्हणत स्पीड ब्रेकरसाठी ग्रामस्थांची तातडीची मागणी
​(हिमायतनगर तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम)
​ हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर–भोकर महामार्गावरील सोनारी फाट्याजवळ शनिवारी दुपारी १२ ते १२:३० वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. हिमायतनगरकडून भोकरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने (क्रमांक MH 26 CP 8860) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना (क्रमांक TS 18 G 1817 व MH 26 BS 5269) जोरदार धडक दिली.
​या भीषण अपघातात रस्त्याकडेला असलेला गुपचुपचा (पानीपूरीचा) गाडा पूर्णपणे ढकलला जाऊन चकणाचूर झाला असून विक्रेत्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
​अपघातात दुचाकीजवळ उभे असलेले दोघे जण गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने सरसम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवले जात असताना एकाचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसऱ्या गंभीर जखमींवर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
​”जनतेचा जीव खूप मौल्यवान आहे!”
​हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा हा अपघातप्रवण क्षेत्र बनला असून या ठिकाणी महामार्गावरून वाहने अत्यंत वेगाने धावतात. त्यामुळे वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी येथे तात्काळ स्पीड ब्रेकर बसवण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थ गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत. सार्वजनिक बांधकाम (राष्ट्रीय महामार्ग) विभागाने प्रशासकीय दिरंगाई सोडून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. “जनतेचा जीव खूप मौल्यवान आहे,” हे ओळखून संबंधित विभागाने तात्काळ या ठिकाणी गतिरोधक उभारावेत, अशी तीव्र भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
​घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार शेख अजमोदीन उप निरीक्षक आणि श्यामसुंदर नागरगोजे यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत अपघाताचा पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास हिमायतनगर पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button