शहर

पुसद मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षप्रवेश सोहळा; अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश


महागाव प्रतिनिधीसंजय नागरगोजे
उमरखेड शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 26 जुलै) पुसद येथे आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राज्यमंत्री इंद्रनील भाऊ नाईक व जिल्हाध्यक्ष बाळाभाऊ पाटील कामारकर यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश पार पडला.
यावेळी तालुकाध्यक्ष शंकर तालंगकर, प्रकाश भाऊ राठोड, सतीश पाटील सव्वाशी, महिला आघाडी अध्यक्षा वनिता ताई चव्हाण, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शाहरुख पठाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. उमरखेड शहराध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
पक्षप्रवेशानंतर राज्यमंत्री इंद्रनील भाऊ नाईक यांनी उमरखेड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढविण्याचे आवाहन केले. तसेच आगामी काळात उमरखेड शहराच्या विकासाकडे विशेष लक्ष देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
या पक्षप्रवेश सोहळ्यात आश्रिती भोकरे, दिपाली राठोड, रेखा गायकवाड, यश जाधव, विठ्ठल पवार, श्रीकांत जाधव, अर्जुन चव्हाण, गजानन इंगोले, अथर खतिब, श्रीधर इंगोले, ओमकार वानखेडे, गजानन जाधव, रोहन पातोडे, वीर राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button