Uncategorized

ग्रामपंचायत पिरंजी येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये माजी सैनिक यांच्या हस्ते ध्वजारोहण

बबलू भालेराव
(यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी )
मो. 9637107518

आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा परिषद शाळेमधील सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद व तसेच गावातील सर्व नागरिकांनी सम्यक बुद्ध विहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले, त्यानंतर तिथून निघालेली रॅली ग्रामपंचायत कार्यालय येथे माजी सरपंच नारायण काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला, ग्रामपंचायत इथल्या ध्वजारोहण झाल्यानंतर अशी सर्व मंडळी जाऊन पी एस सी येथील ध्वजारोहण पार पाडला आहे. त्यानंतर सर्व मंडळींनी जिल्हा परिषद शाळा येथे, माजी सैनिक मधुकर दवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला, त्यानंतर प्रमुख पाहुण्याचे व गावातील ज्येष्ठ नागरिकांचे स्वागत , शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले, त्यानंतर पहिली ते आठवीपर्यंतच्या मुला मुलींनी आपापले मोडक्या थोडक्यात शब्दांमध्ये मनोगत व्यक्त केले व सर्व गावकऱ्यांनी याचा आस्वाद घेतला आहे.

 बबलू भालेराव पत्रकार व तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी 

स्वर्गीय बाबुराव गंगाराम भालेराव सर यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त मुलांना साहित्य वाटप करण्यात आले आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थी मध्ये पहिला व दुसरा क्रमांक काढून शालेय साहित्य मान्यवरांच्या हस्ते दे ण्यात आले,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण जाधव सर, यांनी आभार माने ईगोली सर, यानी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते,देशमुख सर, शिंदे सर, राणे सर, लहाने सर,नीलपवार सर, सर्व शिक्षकांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आहे.

त्यानंतर ग्रामपंचायत पिरंजी येथे स्पर्धा परीक्षांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पुस्तक वाटप करण्यात आले, शासकीय सेवेमध्ये लागलेल्या विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यातआला,
पीरंजी ग्रामपंचायतचे सचिव ठाकरे सर यांनी मोबाईलचा वापर कमी करावा आपल्या भविष्याच्या वाटचालीकडे लक्ष केंद्रित करावे असे त्यांनी सांगितले उपसरपंच शंकर सूळ, नवयुवकांचे मार्गदर्शक, ग्रामपंचायत सदस्य मा. संतोष दादा भावाळ सर्वांना सोबत घेऊन चालणारे, ग्रामपंचायतचे सदस्य देवानंद पाईकराव अजाद समाज पार्टीचे तालुका अध्यक्ष तथा भिम शाहीर यांनी सूत्रसंचालन केले,

पीरंजी गावचे कृषी सहाय्यक शिवाजी परतवाडा साहेब यांनी शेतकऱ्यांना आलेले अनुदान बद्दल माहिती सांगितली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!