शेतात रस्ता नसल्यामुळे चक्क हेलिकॉप्टरची केली शेतकऱ्यांनी तहसिलदारांना मागणी

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
उमरखेड : तालुक्यातील मौजे दिवट पिंपरी येथील शेतकरी अमृत बाबाराव सूर्यवंशी यांनी आपल्या स्वतःच्या शेतात शेतसर्व्ह नंबर ४२ /२ मधील ४ हेक्टर१० आर जमीनीत शेतात जाण्या येण्यासाठी रस्ता नसून त्या शेताच्या अलीकडील शेतकरी रस्ता देत नसून त्या संदर्भात अनेक अर्ज करून सुद्धा तहसील कार्यालयाने कोणती ही भूमिका न घेतल्यामुळे शेतात जाण्या येण्यासाठी व पीक काढण्यासाठी मला शेतात जाता येत नसल्यामुळे मला मानसिक आणि शारीरिक त्रास होत असल्यामुळे चक्क रस्ता नसल्यामुळे हेलिकॉप्टरची मागणी शेतकरी अमृत बाबाराव सूर्यवंशी यांनी तहसिलदारानां अर्जाव्दारे केली आहे
मागील अनेक वेळा उमरखेड येथील तहसीलदार यांना वेळोवेळी अर्ज देऊन सुद्धा महसूल विभागाने कोणतीही कार्यवाही केली नसल्यामुळे शेतात रस्ता देण्यास पुढील शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे मला शेतातील माल जाण्यास खूप त्रास होत आहे त्यामुळे माझी शेती पडीत पडत आहे त्यासाठी मला हेलिकॉप्टर उपलब्ध करून देण्याची मागणी अर्जाद्वारे अमृत बाबाराव सूर्यवंशी या शेतकऱ्यांनी केली आहे या मागणीमुळे सर्व आश्चर्यचकित होत आहे