स्वतःचे यकृत देऊन ‘पतीला दिले जीवदान’ देणाऱ्या सावित्री सुप्रिया देशपांडे यांचा सन्मान नारिशक्ती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सविता चंद्रे यांनी केला.

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
नांदेड येथील नारायण हॉस्पिटलला सविता चंद्रे गेल्या असतात तिथे अचानक भेट झाली सहा महिन्यापुर्वी ज्या सावित्रीने आपले यकृत काढून स्वतःच्या पतीला दिले व त्यांना एक नवीन जीवदान दिले अशा सुप्रिया देशपांडे यांची भेट झाली व त्यांनी त्यांचे कौतुक व सन्मान केला शुद्धसमनाने व हा अविस्मरणीय क्षण आहे येणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त सुप्रिया देशपांडे यांचा नारिशक्ती संस्थेचे अध्यक्ष सविता चंद्रे यांनी दोघा पती व पत्नीचा सन्मान केला. सुप्रिया देशपांडे ह्या नांदेड -मुखेड तालुक्यातील बाराहाळी या गावांमध्ये राहणारे बळवंत देशपांडे हे विद्या विकास विद्यालय जुनियर कॉलेज या ठिकाणी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सध्याचे युग हे धावपळीचे असून या धावपळीच्या युगात जीवन जगत असताना आपलेपणा व नात्यांचा विसर हा सर्वाना पडलेला आपण पाहतो. मात्र सुखी संसाराची दोन चाके म्हणून पती- पत्नी यास ओळखले जाते. तर पत्नी ही नेहमीच पतीच्या सुख – दुःखात कधी झांसीची राणी, माता सावित्री, माता जिजाऊ, माता रमाई, अहिल्यादेवी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत सौ. सुप्रिया देशपांडे यांनी पतीच्या पाठीमागे खंभीर लणे उभे राहत पतीस लिव्हर डोनेट करून
त्यांना नवे जीवदान देवून या कलयुगातील सती सावित्री बनत समाजासमोर एक वेगळा नवा आदर्श ठेवला आहे.