हिमायतनगर नगरपंचायतीच्या प्रभाग १५ मध्ये नगराध्यक्ष शेख रफिक यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाण्याचे पाइप टाकण्याचे काम वेगाने सुरू; नगरसेविका प्रतिनिधी शेख इलियास स्वतः जेसीबीजवळ उपस्थित राहून सोडवत आहेत समस्या!

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
हिमायतनगर शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील काही सुटलेल्या गल्ल्यांमध्ये आणि राहिलेल्या भागात पाण्याचा फ्लो व्यवस्थित होत नसल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचण भासत होती. ही बाब गांभीर्याने घेत नगराध्यक्ष शेख रफिक यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नगरसेविका प्रतिनिधी शेख इलियास शेख कलाम यांनी त्वरित पुढाकार घेतला आहे.
आज, १४ सप्टेंबर २०२६ रोजी राहिलेल्या गल्ल्यांमध्ये पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, नगरसेविका प्रतिनिधी शेख इलियास हे स्वतः घटनास्थळी जेसीबीजवळ प्रत्यक्ष उपस्थित राहून कामाची पाहणी करत आहेत आणि प्रभागातील सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नगराध्यक्ष शेख रफिक यांच्या कुशल नेतृत्वामुळे आणि नगरसेविका प्रतिनिधींच्या या प्रत्यक्ष तत्परतेमुळे परिसरातील नागरिकांनी दोघांचेही मनःपूर्वक आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



