महागाव
आकाशात चंद्र-शुक्र युतीचा मनमोहक नजारा
आकाशात चंद्र-शुक्र युतीचा मनमोहक नजारा
खगोलीय सौंदर्याने नागरिकांचे वेधले लक्ष; कांचन आनंता नागरगोजे यांनी टिपले सुंदर छायाचित्र

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : १४ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या आकाशात चंद्र आणि शुक्र ग्रहाची मनमोहक युती पाहायला मिळाली. चंद्रकोरीच्या जवळ तेजस्वी शुक्र ग्रह चमकत असल्याने आकाशात एक अद्भुत आणि नयनरम्य दृश्य निर्माण झाले होते.
या खगोलीय नजाऱ्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. अनेकांनी काही काळ आकाशाकडे पाहत या सुंदर क्षणाचा आनंद घेतला.
या अविस्मरणीय खगोलीय दृश्याचे सुंदर छायाचित्र कांचन आनंता नागरगोजे यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले. चंद्राच्या शेजारी लखलखणारा शुक्र ग्रह आणि त्याची पार्श्वभूमी असलेले आकाशाचे हे दृश्य नागरिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरले.
निसर्ग आणि खगोलविश्वातील या अद्भुत नजाऱ्याचा अनुभव घेत नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



