Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागावशहर

डीजे बंदीचे आदेश धुडकावणे भोवले!
दहीहंडी आयोजकांसह डीजे मालकांवर गुन्हे; उमरखेडात सलग दोन दिवस पोलिसांची कारवाई


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


महागावप्रतिनिधी संजय नागरगोजे
उमरखेड मध्ये शासन व प्रशासनाने डीजे वापराबाबत पोलीस अधीक्षक यांनी घालून दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांना केराची टोपली दाखवत कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवून दहीहंडी उत्सव साजरा करणे उमरखेड शहरातील दोन आयोजकांना चांगलेच भोवले आहे. सलग दोन दिवस झालेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये दहीहंडी आयोजकांसह डीजे ऑपरेटरविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 223 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईने शहरातील दहीहंडी आयोजकांमध्ये खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र बँकेसमोरील दहीहंडीवर पहिली कारवाई
12 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र बँकेसमोरील मैदानावर सिद्धेश्वर मित्र मंडळाच्या वतीने दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी सुमारे 4 ते 5 फूट उंचीचे मोठे डीजेसदृश बॉक्स, तसेच केबलला लटकवून सहा बॉक्स लावण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. रात्रीपर्यंत मोठ्या आवाजात साउंड सिस्टीम सुरू असल्याने परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी आयोजकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची तसेच उपविभागीय दंडाधिकारी, उमरखेड यांनी 9 सप्टेंबर 2026 रोजी काढलेल्या डीजे वापरावरील प्रतिबंधात्मक आदेशाची माहिती दिली. डीजे बंद करण्याच्या सूचना देतानाच आयोजकाला भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 168 अन्वये लेखी नोटीसही देण्यात आली. मात्र, त्यानंतरही आदेशाचे पालन झाले नसल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल चंदन जाधव यांच्या फिर्यादीवरून जयस्वीन हरी घनघाव (रा. फैल, उमरखेड) आणि विनायक पोहुरकर (रा. चौबारा चौक, उमरखेड) यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक 893/2026, BNS कलम 223 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्याच दिवशी पुन्हा डीजेचा दणदणाट
13 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद मुलांची शाळा मैदान, पुसद रोड, उमरखेड येथे स्व. प्रमोद महाजन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातही मोठ्या प्रमाणात साउंड सिस्टीमचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
कार्यक्रमस्थळी 4 ते 5 फूट उंचीचे मोठे बॉक्स तसेच स्टेजच्या दोन्ही बाजूंना लटकवलेले तब्बल 12 बॉक्स लावण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवून परिसर दणाणून सोडल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी आयोजक आणि डीजे मालकाला प्रशासनाच्या डीजे बंदीच्या आदेशाची माहिती दिल्यानंतरही आदेशाचे उल्लंघन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत भगवान मुसळे यांच्या फिर्यादीवरून प्रणित प्रदीपराव मैड (रा. फैल, उमरखेड) आणि सुरेकांत रामराव लांडगे (रा. गणेशनगर, नांदेड, डीजे ऑपरेटर) यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक 894/2026, BNS कलम 223 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसांत दोन गुन्हे; प्रशासनाचा इशारा स्पष्ट
दहीहंडी उत्सवाच्या नावाखाली प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, हे सलग दोन दिवसांच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. उत्सवाचा आनंद साजरा करताना ध्वनिप्रदूषण आणि प्रशासनाच्या आदेशांचे उल्लंघन टाळावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सलग दोन दिवस झालेल्या या कारवाईमुळे उमरखेड शहरातील आयोजकांना ‘उत्सव साजरा करा; मात्र नियम धुडकावून नाही!’ असा स्पष्ट संदेश मिळाला आहे. आता आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे बंदीच्या आदेशाची अंमलबजावणी पोलिस प्रशासन किती कडकपणे करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button