Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव

अंबोडा येथे श्री गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
पालखी सोहळा, महाप्रसाद व ह.भ.प. यशवंत महाराज देशमुख हिवरेकर यांचे जाहीर कीर्तन


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : तालुक्यातील अंबोडा येथील श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री गजानन महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पुण्यतिथीनिमित्त १४ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण वाचन करण्यात आले.
तसेच १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
याच दिवशी रात्री ८ ते १० वाजेपर्यंत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक ह.भ.प. यशवंत महाराज देशमुख हिवरेकर यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
या धार्मिक सोहळ्यात परिसरातील जास्तीत जास्त भाविक भक्तांनी सहभागी होऊन पालखी सोहळा, महाप्रसाद व जाहीर कीर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गजानन महाराज संस्थान, अंबोडा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्मिक वातावरणात होणाऱ्या या पुण्यतिथी सोहळ्याची भाविकांना उत्सुकता लागली आहे.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button