Uncategorized

हिंगोली लोकसभेची जागा भाजपच्या वाट्याला घ्या(भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट)

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

हिंगोली लोकसभा मतदार संघाची जागा भाजप च्या वाट्याला मागुन घ्यावी यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी केली आहे.
हिंगोली लोकसभा क्षेत्रात भाजप संघटनेचे जाळे घट्ट विणल्या गेले आहे तसेच प्रत्येक लोक प्रतिनिधीने आपल्या कार्यक्षेत्रात जनसेवेसाठी केलेली विकास कामे,केंद्रशासन,राज्य शासनाने राबविलेल्या लोक कल्याणकारी योजना आणि पक्षाची असलेली सक्षमता याच्या जोरावर याठिकाणी भाजप ने उमेदवार दिल्यास याचा नक्कीच फायदा होवुन ही जागा भाजप जिंकु शकते त्यात हिंगोलीच्या जागेचा तिढा अद्याप सुटला नसल्यामुळे ही जागा भाजपच्याच वाट्याला मागुन घ्यावी यासाठी हिंगोली लोकसभा क्षेत्रातील भाजप जिल्हाध्यक्ष फुलाजी मामा शिंदे, मा.आ तानाजी मुटकुळे , भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा मा आ गजानन द घुगे, मा खा शिवाजीराव माने ,मा आ रामराव वडकुते,हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर, डॉ श्रीकांत पाटील,प्रदेश सचिव उद्योग आघाडी मा मिलिंद एम्बल,भाजपा सरचिटणीस मा उमेशजी नागरे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मा पपू चव्हाण, मा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संतोष भाऊ टेकाळे, शहराध्यक्ष मा कैलास सेठ काबरा, लोकसभा अल्पसंख्यांक संयोजक हमीद भाई प्यारेवाले,नवनाथ कानबळे यांच्या शिष्ठ मंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेवुन हिंगोली ची जागा भाजपसाठी कशी फायद्याची असेल याचे विश्लेषण करून ही जागा भाजपच्या वाट्याला मागुन घ्यावी अशी मागणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!