पुसदचा युवक अग्निशस्त्रासह जेरबंद

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
पोफळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिळोना येथे देशी बनावटीच्या पिस्टल (अग्निशस्त्र) व दोन जिवंत काडतुस सह पुसद येथील एक इसम फिरत असतांना ताब्यात घेण्यात आला.
सविस्तर असेकी काल दि. ११/०६/२०२४ रोजी चे सायंकाळी ६ वा. पोलीस स्टेशन पोफाळी चे पथकास गोपनिय माहीती मिळाली की, एक संशयीत इसम त्याच्या ताब्यात एक संशयीत हत्यार बाळगुन मौजा शिळोणा गावच्या समोर रोडवर फिरत आहे.

अश्या गोपनिय खबरेवरुन पोलीस स्टेशन पोफाळी चे पथकाने उमरखेड पुसद रोडवर शिळोणा गावाच्या समोर सापळा रचून असता एक इसम मिळालेल्या माहिती प्रमाणे संशयीतरित्या फिरतांना मिळुन आला. पोलीस स्टेशन पोफाळी च्या पथकाने शिताफीने त्याला ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता आरोपीच्या ताब्यातुन एक काळया रंगाची ग्रीप असलेली सिल्वर रंगाची गावठी बनावटीची पिस्टल व दोन जिवंत काडतुस मिळुन आले. सदर इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख सोहील शेख ख्वाजा, वय २४ वर्षे, रा. मधुकर नगर पुसद असे सांगीतले. त्यास त्याच्या ताब्यातुन मिळुन आलेल्या गावठी बनावटीच्या पिस्टल चे परवाना बाबत विचारणा केली असता त्याने काणताही परवाना नसल्याचे सांगीतले. आरोपीकडुन एक गावठी बनावटीचे मॅगझीन सह पिस्टल व दोन जिवंत काडतुस असा एकुण १७०००/- रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला. आरोपी याने सदर पिस्टल व काडतुस कोठुन आणले व त्याचा वापर कशासाठी करणार होता याबाबत तपास सुरु आहे.
सदरची कारवाई मा. श्री. पवन बनसोड साो., पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा. श्री. पियुष जगताप साो, अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा. श्री. हनुमंत गायकवाड साो, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड, मा. श्री. आधारसिंग सोनोने साो, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर म्हस्के, पोलीस नाईक हर्षद पंडीतकर, पोलीस कॉन्स्टेबल हिम्मत बंडगर यांनी केली.