Uncategorized
शासकीय आदिवासी आश्रम शाळेच्या प्रयोग शाळेला आग

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
पुसद: हर्षी येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेच्या प्रयोग शाळेला आग लागून शाळेतील साहित्य जळून खाक झाले. ही घटना दिनांक १४ जानेवारी सायंकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान घडली आहे . सुदैवाने यात कोणतेही जीवित हानी झाली नाही. हर्षी येथे शासकीय आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा आहे या शाळेतील प्रयोग शाळेला दिनांक १४ तारखेला शाळेत अचानक आग लागली आगीची माहिती पुसद येथील अग्निशामक विभागाला मिळतात अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी काही वेळातच आग नियंत्रणात आणली परंतु अग्निशामक येण्याआधीच विज्ञान शाखेच्या रासायनिक प्रयोगाचे साहित्य व इतर काही साहित्य जळून खाक झाले होते ही आग शॉर्टसर्किट मुळे लागली असल्याचे समजले.