Uncategorized

लेंडीनाला गायब, प्रकरण कोर्टात महामार्ग प्राधिकरण, महसूल विभाग यांना उद्या बाजु स्पष्ट करण्याचा न्यायालयाचा आदेश


शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192


उमरखेड : उमरखेड शहर लगत असलेले ढाणकी रोडवरील गायब झालेल्या लेंडी नाला प्रकरणी शेतकऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असून, न्यायालयाने या बाबत शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेत येत्या 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय ) चे प्रोजेक्ट डायरेक्टर व महसूल विभाग यांना हजर राहून बाजू मांडण्याचा आदेश दिला आहे

ढाणकी रोडवरील परंपरागत नैसर्गिक प्रवाह असलेला लेंडीनाला हा नागपूर तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या, सर्विस रोडच्या कामामुळेच बुजल्या गेला. या परंपरागत लेंडी नाल्या मध्ये येणारा प्रवाह रोखल्या गेल्याने तेथे शहरातून येणारे नालीचे घाणपाणी नागापूर रुपाळा गावच्या सार्वजनिक पाणी पुरवठा विहीरीजवळ साचत असल्याने गावकऱ्यांचे पिण्याचे पाणी दुषित होण्याची भिती गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे दिवसेंदिवस साचत चाललेल्या घाणपाण्यामुळे सार्वजनिक विहीरीचे पाणी दुषीत होऊन हजारो लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे त्यामुळे एनएचएआय संबंधित शेतकऱ्याचा जमीन फोडून नाला काढत असल्याचा आरोप शेतकरी श्रीराम सारडा यांनी केला. राष्ट्रीय महामार्गाच्या मोजमापा बाबत सुरवातीपासूनच आपली कैफियत, प्रशासन व एनएचएआय यांच्यासमोर वारंवार मांडूनही मार्ग निघत नसल्याने शेतकऱ्याने प्रकरण न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने शेतकऱ्याची बाजू ऐकून घेत ह्या प्रकरणी कोणतेही खोदकाम न करता, एनएचएआय व महसूल विभागाला आपली बाजू 12 फेब्रुवारी रोजी मांडण्याचे आदेश दिले. तो पर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा अंतरिम आदेश दिला आहे.
चौकट
हजारो लोकांचा जीव टांगणीला एकीकडे नल्याकाठावरील
शेतकरी प्रशासन व एनएचआयचा वाद
मोजमापावरून रंगला असताना, दुसरीकडे मात्र हजारो लोकांच्या जीवावर संकट निर्माण झाले आहे. लेंडी नाला प्रकरण कोर्टात गेल्याने व यावर अंतरिम आदेश आल्याने, नाल्या बाजूंच्या विहिरी जवळ साचलेल्या दूषित पाण्यामुळे, हजारो लोकांच्या जीवावर बेतण्याचा प्रसंग निर्माण झाला असून, यातून मार्ग निघेपर्यंत हजारो लोकांचा जीव टांगणीला लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!