जिल्हा अधिकाऱ्याचे आदेश असताना कोठारी येथील शेतकऱ्याचा अडवलेला पांदन रस्ता महसूल विभाग मोकळा करतील का?

प्रतिनिधी संजय नागरगोजे
महसूल मंत्री यांनी शेतकऱ्याला शेतात जाण्याकरता रस्ते खुले करून द्या असे आदेश व परिपत्रक असताना पोलीस संरक्षण फुकट असताना महागाव चे तहसीलदार अभय मस्के यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे .दिनांक 26- 5 _2025 रोजी कोठारी येथील शेतकऱ्यांनी शेत सर्वे नंबर 42/ 1 च्या धुऱ्याने पूर्वीपासून पांदन रस्ता असतातना तो रस्ता एका शेतकऱ्याने रस्ता अडवून जेसीबीच्या साह्याने खोदून दुसऱ्या शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरता अडथळा निर्माण केल्यामुळे कोठारी येतील शेतकरी प्रकाश रूप सिंग राठोड ,मधुकर रूपला राठोड ,संतोष रुपला राठोड ,अर्जुन राठोड ,शामराव पवार ,अर्जुन चव्हाण, संजय चव्हाण, लक्ष्मण अर्जुन चव्हाण, परशराम राठोड ,गजानन आडे ,शाम राठोड ,या शेतकऱ्यांनी दिनांक 26 रोजी तहसीलदार मस्के यांना लेखी निवेदन देऊन शेतात जाण्याकरता रस्ता मोकळा करून द्यावा असे लेखी पत्र दिले परंतु कारवाई न झाल्यामुळे महागाव येथे जिल्हाधिकारी आले असताना शेतकऱ्याने त्यांना निवेदन दिले त्यावेळेस जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी उंबरखेड यांना तात्काळ कोठारी येथे जाऊन शशेतकऱ्याचा पांदन रस्ता मोकळा करा असे तोंडी आश्वासन दिले असताना आजपर्यंत कोणते अधिकारी न आल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचा सूर दिसत आहे. त्यामुळे महागाव तालुक्यातील अतिक्रमण झालेले पांदण रस्ते महसूल अधिकारी मोकळे करून शेतकऱ्यांना खुले करून देतील का? असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला आहे