शहर

महसूल विभागाची कामगिरीपैनगंगा नदीतून रेतीचे अवैध उत्खनन

अवैध रेती रोखण्यासाठी प्रशासनाने खोदले खड्डे

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

उमरखेड तालुक्यातील निमगाव मालेगाव चालगणी साखरा चातारी बोरी हातला बेलखेड येथे पैनगंगा नदीतून रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक केली जाते, नदीपात्रातून वाळू वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रस्त्यांवर जेसीबीच्या सहाय्याने प्रशासनातर्फे खड्डे खोदण्यात आले आहेत. महसूल विभागाने रेती तस्करी रोखण्यासाठी खड्डे खोदले आहे. मालेगाव येथील पैनगंगा नदीतून रेतीचे अवैध उत्खनन करून ट्रॅक्टर, टिप्परव्दारे वाहतूक अनेक दिवसांपासून राजरोसपणे वाहतूक केली जात आहे. नदीपात्रातून गावातील काही व्यक्तींच्या सहकार्याने उमरखेड येथील रेती माफिया
बेकायदेशीरपणे वाळू उत्खनन करून गौण खनिजाची चोरी करत होते. रात्रीच्या
अंधारात वाळू तस्करी करणाऱ्यांवर महसूल विभागाने अंकुश लावला आहे.
तक्रारींची दखल

वारंवार अवैध उत्खननाच्या तक्रारी सुरुच असल्याची दखल घेत उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी मालेगाव नदी काठावर जेसीबीच्या साह्याने रस्ता खोदून उत्खनन थांबवले आहे.

रस्त्यावर खड्डे करून वाळू तस्करी थांबविल्याने रेती तस्करांच्या मुस्क्या आवळल्या आहेत.

गत चार-पाच दिवसापासून रेती घाटाजवळ महसूल विभागाने जेसीबीच्या साह्याने मोठे खड्डे केल्याने वाळू तस्करीला ब्रेक लागला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!