नायक फाउंडेशन मधील युवकांनी केली उल्लेखनीय कामगिरी

(अपघात झालेल्या वृध्द महिलेला केले दवाखान्यात दाखल.)
पुसद/उमरखेड प्रतिनिधी :-
एक वृद्ध महिला पुसद येथील सूरज हॉटेल समोर दिग्रस रस्त्याने चालत असताना एका भरधाव मोटरसाइकिल ने जोरात धडक दिली.
रक्तबंबाळ झालेली म्हातारी कशी बशी पुसद बस स्टँड वर पोहचली परंतु तिथे कोणीही तिला दवाखान्यात नेण्यास तयार नाही हे पाहून तिथल्या एका मुलाने नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या अतिश राठोड यांच्या नायक फाउंडेशन ३७५५ शी संपर्क केला.
नेहमीच न्याय मिळवून देणारे समाजातील प्रत्येक व्यक्ती साठी मदतीचा हात समोर करणारे ह्या फाउंडेशन मधील प्रमुख अतिश राठोड, सहकारी मित्र – संगम चव्हाण, शाम राठोड, सेवक राठोड, राज जाधव, कुणाल जाधव, सुधीर राठोड, अजित राठोड, यश राठोड, आदित्य पुलाते, सत्यपाल राठोड, स्वप्नील चव्हाण, संजय राठोड. इत्यादी व्यक्ती तिथं हजर झाले आणि त्या वृध्द आजीला तातडीने दवाखान्यात दाखल केले.
वृध्द आजीला नाव विचारले असता. देवळाबाई शिवा राठोड (वय ७०) असे त्यांनी नाव सांगितले परंतु जेंव्हा घरच्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. सध्या वृध्द आजी ची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना यवतमाळ येथे रेफर करण्यात आले.