Uncategorized

दूरदृष्टी असलेलं लोकांभिमुख नेतृत्व… शरदभाऊ मैंदगेल्या 25 वर्षांपासून सहकार क्षेत्रात अख्ख्या महाराष्ट्रात पुसद अर्बन बँकेचा वटवृक्ष फुलवणारे शरद भाऊ मैंद यांचा आज जन्मदिवस त्यानिमित्य हा लेख प्रपंचशरद भाऊ मैंद

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

हे सहकार क्षेत्रापुरते मर्यादित न राहता सर्वसमावेशक सामाजिक जाणीवेतील व्यक्तिमत्व असून जनतेच्या समस्या सोडवावयाच्या तर त्याला राजकारणाचा आधार लागतो त्याशिवाय समाजकारण यशस्वीपने करता येणे शक्य नाही हे हेरून विधानसभा निवडणुकी पूर्वी त्यांनी राजकारणात प्रवेश केला व पुसद नगरीला एक दूरदृष्टी असलेलं लोकांभिमुख नेतृत्व शरद मैंद यांच्या रूपाने मिळाले
पुसद च्या इतिहासात त्यांनी विविधांगी जनउपयोगी उपक्रम राबवून आपल्या कार्यक्षम दृष्टिकोन आणि लोकांभिमुख प्रवृत्तीचा परिचय दिलेला आहे. पुसदच्या मातब्बर नेत्यांच्या प्रभावळीत शोभतील अशी जी मोजकी नावे पुसद नगरीत आहेत त्यात शरदभाऊ मैंद यांचे नाव अग्रक्रमाणे त्यांच्या नंतर चे समाजाभीमुख नेतृत्व म्हणून घ्यावे लागेल.
सहकार क्षेत्रात सहकार महर्षी,कृषी क्षेत्रात जाणकार, आपत्ती व्यवस्थापनात पारंगत, संघटन कौश्यल्यात निपुण आणि शिक्षण क्षेत्राबद्दल कळवळ असलेले व्यक्तिमत्व, प्रशासकीय कुशलतेमुळे प्रगतशील विचाराची भूमिका भाऊंनी कायम ठेवली त्यामुळे सर्व पक्षांशी नेहमी मैत्रीभाव जपला आहे. त्यामुळे भाऊ सर्वसमावेशक आहेत.
त्यांना कोणताही विषय वर्ज्य नाहीत्यांच्या कानावर एखादा नवीन शब्द वा विषय पडला कि लगेच ते तो विषय नक्की काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात त्या विषयातील तज्ञासोबत संपर्क करून संवाद साधतं विषय समजून घेताना दिसतात. समाजाचे आपण काही देणे लागतो त्यासाठी त्यांच्या उपयोगी पडावं, गरजूच्या मदतीला जावं, त्यांच्या सुख दुःखात सहभागी व्हावं ही जाणीव भाऊंमध्ये मी प्रकर्षाने पाहिली. संपर्कात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रसंगाला आपलस करण्याची किमया त्यांना साध्य झाली आहे. शरदभाऊ इतकी माणसाची पारख असणारी व्यक्ती माझ्या पाहण्यात पुसद मध्ये तरी दुसरी नाही. एखाद्या व्यक्तीसोबत एका मिनिटाच्या संवादातही ते व्यक्तिमत्व ओळखू शकतात अशी पारख त्यांना आहे. कोणाशी किती अंतर राखून बोलायचे कुठे मनमोकळ्या गप्पा मारायच्या? हे ती व्यक्ती कोण? यावर ठरवतात.कोणाच्या मनात काय आहे? हे अचूक हेरण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. कोणत्या व्यक्तीला कोणती जबाबदारी द्यायची जी तो योग्यरित्या पार पाडू शकेल याची पूर्व कल्पना त्यांना आहे म्हणून पुसद अर्बन को ऑप बँक, भारती मैंद सहकारी पतसंस्था असो अथवा पोद्दार लर्निंग स्कूल यात निवडलेले कर्मचारी गेली कित्येक वर्ष उत्तम पद्धतीने काम करत आहेत. पुसद मधे लागलेली सहकार क्षेत्र डबघाईस आलेले असताना शरद भाऊंनी सहकार क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. त्यांच्या कामात ताठरता व शिस्तप्रियता असल्याने आज या सर्व कर्मचाऱ्यांची रोजीरोटी त्यांच्यामुळे साबूत आहे. भाऊंचा स्वभाव ताठर असला तरी मायेचा ओलावा त्यांच्यात अगदी फणसाप्रमाणे आहे.
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक बाबत आलेल्या वेगवेगळ्या अनुभवातून त्यांचे समृद्ध व्यक्तिमत्व घडले. कठीण परिस्थितीतून योग्य मार्ग काढून त्या मार्गांवर चालण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. संकट काळात ते खंबीर पणे निर्णय घेतात शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला मदत, पूरग्रस्ताना मदत व शासनदरबारी त्यांची व्यथा पोहचविणे,अनाथाना मदत,बेघरांना निवारा,गरीब व गरजू हुशार विध्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांना दत्तक घेणे असो वेळोवेळी शरद भाऊंनी मदतीचा हात समोर केला आहे.कोरोना महामारीच्या लढ्यात भाऊंनी कोविड सेंटर स्थापन करून रुग्णांना आरोग्य विषयक सुविधा देऊन संवेदना किती जागृत आहेत याचा प्रत्येय त्यावेळी दिला
शरद भाऊंनी राजकारणात विधानसभा निवडणुकी पूर्वी पदार्पण केल आणि पुसदचे सर्व राजकीय समीकरनेच बदलून गेलेत. भाऊच्या रूपाने सर्वसमावेशक नेतृत्व जे पुसद विधानसभेला हवं होत ते मिळालं आहे अशी जनमाणसाच्या तोंडून ऐकण्यास मिळते आहे. राजकारण पदार्पना पासून ते आजवर अखंड,अथक काम करत राहण्याच्या बाबतीत तर मला वाटत भाऊंशी कोणी जिंकूच शकत नाही.
भाऊ गंभीर तितकेच सदाबहार व समोरच्याला बहार व बहर आणणारे नेते आहेत कार्यकर्ता मोठा करण्याचा प्रयत्न नेहमी त्यांचा राहिला व आहे कामाच्या व्यापातही जनसंपर्क दांडगा ठेवून अथक, अथांग आणि अपार अशी वृत्ती त्यांची असून कार्यकर्त्याशी सूसंवाद त्यांचा कायम आहे. त्यांची समस्या सोडवण्यासाठी ते मुंबई मंत्रालया पर्यंत धडक देतात त्यामुळे जनतेच्या मनात “कामाचा माणूस ” ही प्रतिमा त्यांची निर्माण झाली आहे. त्यामुळे ध्येय निश्चिती असलेला हा नेता या विभागाचे प्रतिनिधित्व करायला सज्ज असून त्यांना भविष्यात आमदारकीची संधी पुसद विधानसभेतील जनतेने दिल्यास त्याच चीज ते करतील हे निर्विवाद सत्य नाकारता येत नाही आज त्यांचा जन्मदिन त्यानिमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…..जीवेत शरद: शतम
संदेश गौतमराव रणवीर
डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधिनी काळी दौलत ता महागांव जिल्हा यवतमाळ 9921154505

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!