सामाजिक

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्थानिक नगरपालिका उद्यानासमोरील पुतळ्याला अभिवादन करण्यात आले यावेळी सर्वप्रथम पुष्पमाला अर्पण करून धूप दिपा नि पूजन करण्यात आले यानंतर उपस्थित बौद्ध अनुयायानी सामूहिक रित्या बुद्ध वंदना घेण्यात आली त्यानंतर दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत काळबांडे सर यांनी केले याप्रसंगी प्राध्यापक धनराज तायडे गजानन दामोदर उद्धव गायकवाड प्रा .भगत, चवरे मॅडम यांनी आपले विचार व्यक्त करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकीत आपले विचार व्यक्त केले सदर कार्यक्रमाला माजी सैनिक मिलिंद बर्डे सिंगनकर आठवले सोनुले अडागळे दत्तामामा शिंगारे प्राध्यापक तायडे सुभाष बर्डे सतीश कोल्हे अर्जुन बर्डे प्रवीण बर्डे भगत सर राहुल काळबांडे महेंद्र बडे राव इत्यादी मान्यवर व मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी उपस्थित होते( सोबत फोटो)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!