Uncategorized

अवैध धंद्याविरोधात रणरागिनींचा एल्गार अवैध धंदे बंद झाले तरच खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल सरोजताई देशमुख

मुख्य संपादक

उमरखेड :-
तालुक्यात शहरी वग्रामीण भागात व्यसनाधीनतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले असल्याने यामुळे महिलावर्गाला अतोनात यातना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे शहर व तालुक्यातील अवैध दारू जुगार व गांजासारख्या नशिल्या पदार्थांचे अवैध धंदे तत्काळ बंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सहसचिव सरोजताई देशमुख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनाद्वारे मीदिला आहे.

नुकताच जागतिक महिला दिन साजरा झाला यानिमित्ताने महिलांचा सर्वत्र मानसन्मान करण्यात येतो, मात्र तालुक्यातील अवैध दारू जुगार व गांजा राजरोसपणे विक्रीच्या वाढत्या प्रमाणामुळे शहरी व ग्रामीण भागातील महिला अक्षरशः मोठ्या यातना सोसत आहेत तरुण मुले मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी जात आहेत कौटुंबिक कलह दिवसेंदिवस वाढत आहेत अनेक कुटूंबातील व्यसनाधीन पुरुषांकडून महिलांचा अतोनात छळ होत आहे. शाळकरी मुले सुद्धा गांजासारख्या नशेच्या अधीन जात आहेत त्यांना नशेच्या विळख्यात अटकविणाऱ्या अवैध नशिले पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध तसेच अवैध दारू मटका जुगार चालकाविरुद्ध कठोर कारवाई करून अवैध धंद्यांना आळा घालावा अशा आशयाचे निवेदन जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सहसचिव सरोजताई देशमुख, तालुका अध्यक्ष शोभा राऊत, यशोदा सोनटक्के, रंजना सुरोशे, ललिता खंदारे, अरुणा राठोड, वंदना पानपट्टे गंगा, नंदा तावडे, अश्विनी भोकरे, रेखा भुते, गडदे, चक्रधर पाटील देवसरकर, विष्णू रणमले स्वप्निल कनवाळे, दत्तराव भालेराव यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांना निवेदन देऊन अवैध धंद्यांविरोधात तत्काळ ठोस कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा निवेदनातून दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button