शहर

पुसद शहर जि. यवतमाळ हददीतील नुर कॉलनी येथील अवैध गॅस सिलेंडर साठवणुक करणा-या इसमा विरुध्द गुन्हा दाखल एकूण ४० गॅस सिलेंडर २३ रेग्युलेटर असा एकूण अंदाजे २,५०,०००/- रु मुददेमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना यश

सहसंपादक शेख मुजाहिद

यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध गॅस सिलेंडर साठवणुक, अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत. दिनांक १३/०३/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद येथील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पुसद उपविभागात अवैध धंदे, अवैध गॅस सिलेंडर साठवणुक, बाबत गोपनिय माहीती काढत असतांना 12/00 वाजण्याचे सुमारांस माहीती मिळाली कि, इसम नामे-आरिफ मोहम्मद कच्ची यांच्या घरी अवैध गैस सिलेंडर साठवणुक करुन काळया बाजारात जादा किंमतीने विक्री करीत आहे अशी माहीती प्राप्त झाल्याने पुरवठा

निरीक्षक पुसद तसेच पंचा सह सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता इसम नामे-आरिफ मोहम्मद कच्ची यांच्या घरी अवैध भारत, एचपी (HP), व इण्डेन अशा वेगवेळया कंपनीचे एकूण 40 गॅस सिलेंडर तसेच 23 रेंग्युलेटर मिळून आल्याने इसम नामे-आरिफ मोहम्मद कच्ची रा.नूर कॉलनी सुभाष वार्ड पुसद ता. पुसद जि. यवतमाळ याचेकडे सदरचे गॅस बाबत विचारपूस केली असता उडवा-उडवीचे उत्तरे देवू लागल्याने सदरचे गॅस सिलेंडर हे अवैधरित्या साठवणुक करुन जादा दराने विक्री करीत असल्याने एकूण 40 गॅस सिलेंडर, 23 रेग्युलेटर असा अंदाजे २,५०,०००/- रु मुददेमाल जप्त करुन ताब्यात घेवून पुरवठा निरीक्षक पुसद यांच्या तक्रारी वरुन पुसद शहर पो स्टे येथे जिवनावश्यक वस्तू अधिनियमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा, मा. सहा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हर्षवर्धन बी जे सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, मा. तहसिलदार पुसद रेखा वाणी मॅडम यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे, पोउपनि/शरद

लोहकरे, सफौ/मुन्ना आडे, पोहवा संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/रमेश राठोड, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोशि/सुनिल पंडागळे, पोउपनि रविंद्र शिरामे, पोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, मपोहवा/मनिषा वाघमारे पो स्टे पुसद शहर, मपोशि/संदली चांदले RCP पथक तसेच निरीक्षण अधिकारी अमोल महाजन, पुरवठा निरीक्षक आशिष पवार, संगिता तेर, अव्वल कारकून छाया जामकर, लिपीक अमित अजमिरे, छाया लोंढे, गोदाम व्यवस्थापक सतिष आळणे तहसिल कार्यालय पुसद यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button