हिमायतनगरच्या प्रभाग १३ मध्ये विकासाचा धडाका! लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफीक यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक सरदार खान पठाण यांचा लोककल्याणाचा ध्यास

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवून त्यांना थेट दिलासा देणे हीच खरी लोकसेवा! याच भावनेतून लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफीक यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक १३ चे धडपडी नगरसेवक सरदार खान खलील खान पठाण यांनी परिसरातील पाणीप्रश्न चुटकीसरशी सोडवला आहे. आज दि. ०४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रभाग १३ मधील अर्शद भाई यांच्या घरासमोरील बोअरवेलमध्ये नवी सबमर्सिबल मोटर बसवून स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला.
स्थानिक नागरिकांची गरज ओळखून नगरसेवक सरदार खान खलील खान पठाण यांनी स्वतः उभे राहून हे काम वेगाने पूर्ण करून घेतले. तीव्र उन्हाळ्याच्या दिवसांत नागरिकांना पाण्यासाठी भयंकर हाल सोसावे लागू नयेत म्हणून नगरसेवक सरदार खान खलील खान पठाण यांनी स्वतःचा टँकर संपूर्ण प्रभाग क्रमांक १३ मध्ये फिरवून नागरिकांच्या थेट घराघरांपर्यंत पाणी पोहोचवण्याचे मोठे कार्य केले होते.
एवढ्यावरच न थांबता, नगरसेवक सरदार खान खलील खान पठाण यांनी पुढे सांगितले की, “येत्या काही दिवसांत दाल मिल जवळ आणि ड्रीम बार जवळ सुद्धा तातडीने नवीन मोटर बसवून पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मिटवला जाईल.” सोबतच पावसाळ्यामुळे ज्या ठिकाणी चिखल झाला आहे, तिथे नागरिकांना ये-जा करताना त्रास होऊ नये म्हणून मुरुम-चुरी टाकून रस्ते तात्काळ सुस्थितीत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
नगरसेवक सरदार खान खलील खान पठाण यांच्या या धडाडीच्या आणि जनहितैषी कार्यपद्धतीमुळे प्रभागात आनंदाचे वातावरण आहे. याप्रसंगी महमुद खान, अरशद भाई, फारुक भाई, तुलसीराम घिसडी आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफीक आणि नगरसेवक सरदार खान खलील खान पठाण यांच्या या लोकोपयोगी कामाचे सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे.



