शहर

यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा सचिवपदी पूजा अंबादास धुळे यांची निवड

यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीची नूतन जिल्हा कार्यकारणी नुकतीच घोषित करण्यात आली असून, यामध्ये उमरखेड येथील धडपडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या पूजा अंबादास धुळे यांची यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ‘जिल्हा सचिव’ पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीने उमरखेड तालुका काँग्रेस कमिटी व सामाजिक वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
​मागील तीन वर्षांपासून ‘अंबादास धुळे मित्र मंडळ’च्या वतीने उमरखेड शहरासह ग्रामीण भागात विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. सर्वसामान्य आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या सतत अग्रेसर राहिल्या आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर जिल्हा सचिव पदाची महत्त्वाची जबाबदारी प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोपवली आहे.
​आपल्या निवडीबद्दल मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या, “विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून बहुजन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत काँग्रेस पक्षाची विचारधारा पोहोचवणे आणि संघटन मजबूत करणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट असेल.”


​पूजा धुळे यांनी आपल्या या यशस्वी निवडीचे श्रेय काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, जिल्हा नेतृत्त्व, स्थानिक पदाधिकारी, ‘अंबादास धुळे मित्र मंडळा’चे सहकारी तसेच तालुक्यातील नागरिक व कार्यकर्त्यांना दिले आहे.

​या निवडीबद्दल तालुक्यातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून पूजा धुळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सोबत फोटो

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button