Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
Uncategorizedशहर

उमरखेड गटात मतांच्या गणिताने फिरवला निकाल; प्रकाश पाटील देवसरकर यांना पराभवाचा धक्का!

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

राम देवसरकर आणि प्रकाश पाटील देवसरकर यांना प्रत्येकी २५ मते; ईश्वरचिठ्ठीत राम देवसरकर यांच्या बाजूने कौल
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमरखेड तालुका गटातील निकालाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या गटात माजी आमदार तथा माजी संचालक प्रकाश पाटील देवसरकर आणि राम देवसरकर यांना प्रत्येकी २५ मते मिळाली. एका मतपत्रिकेवरील मत बाद ठरले, तर डॉ. अंकुश देवसरकर यांना एक मत मिळाले. त्यामुळे दोन्ही प्रमुख उमेदवारांची मतसंख्या समान झाल्याने निकालासाठी ईश्वरचिठ्ठीचा आधार घेण्यात आला.
अखेर ईश्वरचिठ्ठीत राम देवसरकर यांचे नाव निघाल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. अत्यंत चुरशीच्या या निकालामुळे प्रकाश पाटील देवसरकर यांना पराभवाचा धक्का बसला. मतांची समान संख्या आणि त्यानंतर ईश्वरचिठ्ठीद्वारे झालेला निर्णय यामुळे उंबरखेड तालुका गटातील निवडणूक विशेष चर्चेत आली आहे.

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button