Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
शहर

हिमायतनगर तालुक्यात सोयाबीनचा एकरी अवघा ३ ते ५ क्विंटल उतार; शेतकरी त्रस्त असल्याची फेरोज खान यांची प्रतिक्रिया!

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
कडक उन्हात राबून, हाताला फोड येईपर्यंत खुरपणी करून आणि रात्री-अपरात्री शेतात घााम गाळून पिकवलेले सोयाबीन जेव्हा हाती आले, तेव्हा हिमायतनगर तालुक्यातील बळीराजा हादरून गेला. यंदा तालुक्यात सोयाबीनचा एकरी अवघा ३ ते ५ क्विंटल तुटपुंजा उतार आल्यामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने लावलेला मूळ खर्चही निघालेला नाही. यामुळे तोंडावर आलेल्या रब्बी हंगामातील हरभरा (चना) पेरणी कशी करावी, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
या बिकट परिस्थितीवर भाष्य करताना नांदेड जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान म्हणाले की, “मातीत अहोरात्र घाम गाळून शेतकरी पीक उभे करतो, पण यंदा सोयाबीनचा अत्यंत कमी उतार आल्यामुळे आणि योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडून अत्यंत त्रस्त व परेशान झाला आहे.”

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button