Uncategorized
फायरींग प्रशिक्षण सत्र ५० मध्ये पो.उ.नि. मिलिंद कात्रे यांचा द्वितीय क्रमांक; उपविभाग भोकरतर्फे सन्मान

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी : शेख खय्यूम):
नांदेड पोलीस मुख्यालयात आयोजित फायरींग प्रशिक्षण सत्र क्रमांक ५० मध्ये हिमायतनगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ग्रेड पोलीस उपनिरीक्षक श्री. मिलिंद विठ्ठलराव कात्रे यांनी आपल्या अत्यंत अचूक व बेधडक निशाण्याने द्वितीय क्रमांक पटकावून संपूर्ण पोलीस दलाची मान उंचावली आहे. अहोरात्र, भर उन्हा-पावसात, स्वतःच्या सुखाचा त्याग करून जनतेच्या रक्षणासाठी अत्यंत खडतर परिस्थितीत सेवेत तत्पर राहणाऱ्या एका पोलिसाचे कष्ट आणि निष्ठा काय असते, हेच या ऐतिहासिक यशामधून पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, त्यांच्या या प्रेरणादायी कामगिरीबद्दल उपविभाग भोकरतर्फे त्यांना अधिकृत सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन अत्यंत उत्साहात आणि थाटात गौरविण्यात आले आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802