Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागावशहर

जिल्हा बँक निवडणुकीत महागाव गटातून नितीन भुतडा यांच्या बाजूने कौल!
२८ प्रतिनिधींपैकी २५ जणांचा पाठिंबा मिळाल्याचे चित्र; शिवाजी देशमुख यांना मोजक्या मतांवर समाधान?

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ११ ऑक्टोबर रोजी महागाव तालुका गटातील मतदानाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदान केंद्रावर सकाळी साडेअकराच्या सुमारास आमदार किसनराव वानखडे, नितीन भुतडा, संभाजी नरवाडे, माजी आमदार निलय नाईक आणि सभापती दीपक आडे यांच्यासह समर्थक प्रतिनिधी मतदानासाठी उपस्थित होते.
महागाव तालुका गटातील एकूण २८ प्रतिनिधींपैकी २२ प्रतिनिधींना सोबत घेऊन मतदानाची प्रक्रिया पार पडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर नितीन भुतडा यांच्या बाजूने २५ प्रतिनिधींनी कौल दिल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे महागाव गटातून नितीन भुतडा यांच्या विजयाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.
दुसरीकडे, प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजी देशमुख यांच्या पारड्यात अवघी दोन ते तीन मते पडल्याचे सांगितले जात असून, त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र दिसून आले. मात्र, मतमोजणीचा अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतरच विजय आणि मतांची अंतिम आकडेवारी स्पष्ट होणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या निवडणुकीमुळे महागाव तालुक्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button