Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
शहर

उमरखेड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी!


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

गहाळ झालेले ७ तोळे सोन्याचे दागिने शोधून मूळ मालकाला केले परत; १० लाखांचा ऐवज सुखरूप हस्तगत

उमरखेड : रस्त्यात गहाळ झालेल्या तब्बल ७ तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांचा शोध घेऊन ते मूळ मालकाला सुखरूप परत करण्यात उमरखेड पोलिसांना यश आले आहे. बाजारभावानुसार अंदाजे १० लाख रुपये किमतीचे सोन्याचे सर्व दागिने पोलिसांनी शोधून काढत प्रामाणिकपणे संबंधित महिलेकडून ताब्यात घेतले आणि मूळ मालकाच्या स्वाधीन केले. उमरखेड पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, उमरखेड येथील तक्रारदार राधेश्याम नरसिंगदास भट्टड यांच्या पत्नी २६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ ते ३ वाजताच्या दरम्यान सोन्याचे दागिने सराफा दुकानात घेऊन जात होत्या. यावेळी त्यांच्याकडील वेगवेगळे सोन्याचे दागिने असलेले पाऊच रस्त्यात कुठेतरी पडले. यामध्ये एकूण ७ तोळे सोन्याचे दागिने होते. याबाबत त्यांनी ३० सप्टेंबर रोजी उमरखेड पोलीस ठाण्यात दागिने गहाळ झाल्याची तक्रार दाखल केली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुंडे यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी गौरव कायंदेपाटील यांना माहिती दिली. त्यांच्या सूचनेनुसार डी.बी. पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व त्यांच्या पथकाला दागिन्यांचा शोध घेण्याची जबाबदारी देण्यात आली.

पोलिसांनी गोपनीय माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या तपासात सदर दागिने ढाणकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिटरगाव येथील एका महिलेला सापडल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संबंधित महिलेकडे विचारपूस केली असता तिने कोणताही आडपडदा न ठेवता सर्व दागिने पोलिसांच्या स्वाधीन केले. हे दागिने नेमके कोणाचे आहेत किंवा कोणाकडे सुपूर्द करायचे, याची माहिती नसल्याने आपण ते स्वतःजवळ सुरक्षित ठेवले होते, असे तिने सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी एकूण ७ तोळे वजनाचे आणि अंदाजे १० लाख रुपये बाजारमूल्य असलेले सर्वच्या सर्व दागिने ताब्यात घेतले. आज सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी गौरव कायंदेपाटील यांच्या हस्ते हे दागिने मूळ मालक राधेश्याम नरसिंगदास भट्टड यांना आहे त्या सुस्थितीत परत करण्यात आले.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक गौरव कायंदेपाटील, प्रभारी ठाणेदार स.पो.नि. अमोल गुंडे, स.पो.नि. व्यंकट गंगलवाड आणि स.पो.नि. विनायक रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत डी.बी. पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, सहायक फौजदार विजय पतंगे, पोलीस हवालदार चंदन जाधव, पोलीस कॉन्स्टेबल संघशिल टेंभरे, विष्णू राठोड, दिगांबर गिते, निवृत्ती महाळनवर आणि अंबादास गवारे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

गहाळ झालेल्या मौल्यवान दागिन्यांचा अल्पावधीत शोध घेऊन ते मूळ मालकाला परत मिळवून देण्याच्या उमरखेड पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये पोलिसांप्रती विश्वास अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button