Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव

जनता सहकारी पतसंस्थेच्या संचालकांकडून वसुलीला सुरुवात
जप्तीच्या नोटिशीनंतर दोन संचालकांनी भरले प्रत्येकी १ लाख ७८ हजार; इतर संचालकही रक्कम भरण्याच्या तयारीत


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


महागाव प्रतिनिधी | संजय नागरगोजे
महागाव : जनता सहकारी पतसंस्था मर्यादित, महागाव या संस्थेच्या थकीत कर्जवसुलीच्या अनुषंगाने वसुली अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, पुसद यांच्याकडून संचालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. नोटिशीत नमूद रक्कम, व्याज व इतर देयकांची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले असून, रक्कम न भरल्यास कायद्यानुसार जप्ती व मालमत्ता विक्रीची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या नोटिशीनंतर संस्थेच्या संचालकांमध्ये खळबळ उडाली असून वसुलीला सुरुवात झाली आहे.
जनता सहकारी पतसंस्थेचा कारभार अध्यक्ष अनंता नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. वसुली अधिकाऱ्यांची नोटीस प्राप्त झाल्यानंतर दीपक मारोतराव राऊत (पाटील) यांनी १ लाख ७८ हजार रुपये, तर सुरेश गंभीरमल शर्मा यांनीही १ लाख ७८ हजार रुपये भरल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे. तसेच प्रकाश धोंडोपंत पांडे यांनी काही रक्कम भरल्याचे सांगण्यात आले असून, उर्वरित संचालकही रक्कम भरण्याच्या तयारीत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अनंता नागरगोजे यांनी सांगितले.
१८ संचालकांच्या नावांचा नोटिशीत समावेश
वसुली नोटिशीत खालील व्यक्तींच्या नावांचा व देय रकमेचा समावेश आहे—
श्री. दीपक मारोतराव राऊत, रा. अंबोडा, ता. महागाव
श्री. सुरेश गंभीरमल शर्मा, रा. महागाव
श्री. नामदेव गोपाळराव उमरेकर, रा. महागाव
श्री. आयुब सुलेमान सुरेया, रा. अंबोडा
श्री. प्रकाश धोंडोपंत पांडे, रा. महागाव
श्री. सत्यनारायण गंगाप्रसाद जयस्वाल, रा. महागाव
श्री. सुधाकर दाजबा टेकाडे, रा. सवना, ता. महागाव
श्री. अशोकराव रामचंद्र भवाणकर, रा. कलगाव, ता. महागाव
श्रीमती सुरेखाबाई लक्ष्मणराव दमकोंडवार, रा. महागाव
श्रीमती संजीवनी नारायण इंगळे, रा. महागाव
श्री. दीपक एकनाथ चिन्नावर, रा. महागाव
श्री. जयंत अरविंद पांडे, रा. महागाव
श्री. कृष्णकांत लक्ष्मणराव खंडारे, रा. कलगाव
श्री. राजेंद्र दत्तात्रय तावडे, रा. अंबोडा
श्री. कबीरदास हरिसिंग राठोड, रा. चिचपाड, ता. महागाव
श्री. सुभाष देवराव नरवाडे, रा. महागाव
श्री. सोनबा किसन पवार, रा. पिंपळगाव (ई), ता. महागाव
श्री. पुंडलिक के. कोवे, रा. चांदूररेल्वे, जि. अमरावती
चेकद्वारे वसुली सुरू
नोटिशीनंतर जप्तीची कारवाई टाळण्यासाठी संचालकांकडून स्वेच्छेने रक्कम भरण्यास सुरुवात झाली आहे. जनता सहकारी पतसंस्थेच्या नावाने चेकद्वारे रक्कम स्वीकारून वसुलीची प्रक्रिया सुरू असल्याचे अध्यक्ष अनंता नागरगोजे यांनी सांगितले. उर्वरित संचालकांनीही लवकरच आपापली देय रक्कम भरण्याची तयारी दर्शविल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वसुली अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या नोटिशीत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व संबंधित नियमांनुसार थकीत रक्कम, व्याज आदींची पूर्तता करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. मुदतीत रक्कम न भरल्यास संबंधितांच्या मालमत्तेवर जप्ती करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही नोटिशीत देण्यात आला आहे.
“जप्तीची कारवाई होऊ नये यासाठी संचालकांनी स्वतःहून रक्कम भरण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत काही संचालकांनी मोठी रक्कम भरली असून उर्वरित संचालकही रक्कम भरण्याच्या तयारीत आहेत. सर्व रक्कम चेकद्वारे जनता सहकारी पतसंस्थेच्या नावाने स्वीकारली जात आहे,” अशी माहिती अध्यक्ष अनंता नागरगोजे यांनी दिली.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button