जातीयवाद, धार्मिक वादाला नका देऊ थारा; माणूस म्हणून जगू हाच नवा नारा’
महागाव पोलीस ठाण्याबाहेरील संदेशाची शहरवासीयांमध्ये चर्चा

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
जातीयवाद, धार्मिक वादाला नका देऊ थारा; माणूस म्हणून जगू हाच नवा नारा’
महागाव पोलीस ठाण्याबाहेरील संदेशाची शहरवासीयांमध्ये चर्चा
महागाव : महागाव पोलीस ठाण्यात ठाणेदार म्हणून सेवानंद वानखडे रुजू झाल्यानंतर पोलीस ठाण्याच्या बाहेर लावण्यात आलेल्या एका आगळ्यावेगळ्या फलकाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘जातीयवाद, धार्मिक वादाला नका देऊ थारा; माणूस म्हणून जगू हास नवा नारा’ असा संदेश या फलकावर देण्यात आला आहे.
समाजात जातीय व धार्मिक वादापेक्षा माणुसकी, शांतता आणि सामाजिक सलोखा महत्त्वाचा असल्याचा संदेश या फलकातून देण्यात आला आहे. ठाणेदार वानखडे यांच्या या उपक्रमाची नागरिकांमध्ये चर्चा होत असून, सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधण्याची आणि सामाजिक प्रश्नांकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची त्यांची भूमिका यातून दिसून येते.
महागाव तालुक्यातील नागरिकांना या संदेशाचा नेमका अर्थ समजावा आणि ‘माणूस म्हणून जगू’ या विचाराला सामाजिक जीवनात महत्त्व मिळावे, या उद्देशाने या फलकाची दखल घेणे आवश्यक असल्याचे चित्र आहे. साहेबांचे विचार सर्व सामान्य पर्यंत पोहोचावे म्हणून ही बातमी लिहिली आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



