Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
शहर

हिमायतनगर फाटकावर मालगाडी अडकल्याने मुख्य रस्ता तासनतास ठप्प; उड्डाणपुलाच्या (ROB) मंजुरीची आग्रही मागणी!


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
हिमायतनगर शहरातील नांदेड, किनवट आणि आदिलाबादकडे जाणाऱ्या मुख्य महामार्गावरील रेल्वे फाटकावर आज, २५ सप्टेंबर (शुक्रवार) रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास भारतीय रेल्वेच्या मालगाडीत (इंजिन क्र. 65206) तांत्रिक बिघाड झाल्याने ती गेटवरच अडकून पडली. मालगाडी थांबल्यामुळे रस्त्यावरील दुचाकी, चारचाकी वाहनांची वाहतूक दोन्ही बाजूंनी तासनतास पूर्णपणे ठप्प झाली होती.
या भीषण वाहतूक कोंडीत शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, व्यापारी आणि शासकीय अधिकारी तासनतास अडकून पडले. भविष्यात आपत्कालीन स्थितीत नांदेडकडे गंभीर रुग्णाला घेऊन जाणारी ॲम्बुलन्स अशाच प्रकारे अडकल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नेहमीच विकासाच्या बाबतीत मागे राहिलेल्या हिमायतनगरला या त्रासातून दिलासा देण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि MSRDC ने संयुक्तपणे रेल्वे लाईनवर तातडीने ‘रेल्वे उड्डाणपूल’ (ROB) मंजूर करावा, अशी आग्रही मागणी नागरिक करत आहेत.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button