Uncategorized
नांदेड जिल्ह्यात अभूतपूर्व दबदबा: किनवट नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा. श्री. रोहित भगरे सरांचा भव्य नागरी सत्कार!

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
नांदेड़ (प्रतिनिधी शेख खय्यूम):
आपल्या अलौकिक आणि उत्कृष्ट प्रशासकीय कौशल्याने किनवट शहराचा कायापालट करून विकासाची नवी दिशा देणारे नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी मा. श्री. रोहित भगरे सर यांच्या उत्तुंग कामगिरीची दखल घेत त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
किनवट शहरात राबवलेली विविध विकासकामे आणि उल्लेखनीय प्रशासकीय कामगिरीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष शेख रशीद कासीम खुरेशी (किनवट) यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन भगरे सरांचा अत्यंत थाटामाटात व कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला.
या विशेष आणि गरिमापूर्ण प्रसंगी ॲडव्होकेट दिनेश येउतकर सर आणि श्री. संजय भाऊ पेनदौर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. मुख्याधिकारी रोहित भगरे सरांच्या या गौरवशाली कामगिरीचे संपूर्ण परिसरातून मोठे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



