३३ वर्षांची खडतर सेवा अन् जिद्दीला यश; कर्तव्यरत्न शेख चाँद कारलेकर थेट ‘फौजदार’ पदावर विराजमान!

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
पोलिसांच्या वर्दीत तब्बल ३३ वर्षे अहोरात्र कर्तव्य बजावत प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण करणारे, हिमायतनगर तालुक्यातील कारला गावचे सुपुत्र श्री. शेख चाँद साहेब कारलेकर यांनी आपल्या जिद्दीच्या बळावर थेट ‘फौजदार’ (PSI) पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या गौरवास्पद व प्रेरणादायी यशाने संपूर्ण हिमायतनगर तालुक्याचे नाव उंचावले असून, सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आपल्या प्रदीर्घ सेवेदरम्यान त्यांनी इतवारा, तामसा, इस्लापूर, विमानतळ, बॉम्ब शोधक व नाशक पथक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), स्थानिक गुन्हे शाखा (LCB), दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि मुंबईसारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी आपल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र पोलिसांकडून त्यांना विशेष सन्मानचिन्हासह तब्बल १२० रिवार्ड्स आणि १० प्रशस्तीपत्रे प्राप्त झाली आहेत.
सध्या दहशतवाद विरोधी पथकात (ATS) सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) म्हणून कार्यरत असताना मिळालेली ही फौजदार पदावरील पदोन्नती म्हणजे त्यांच्या वर्षानुवर्षांच्या कष्टाचे फळ आहे. या यशाबद्दल तंटामुक्त अध्यक्ष डॉ. गफार कारलेकर, माजी आमदारांसह तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि समस्त हिमायतनगर वासियांकडून त्यांचे कोटी-कोटी हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



