गावठी बनावटीच्या देशी पिस्तुलासह तरुणाला अटक; ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
पुसद : यवतमाळ जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत पुसद परिसरातून एका २३ वर्षीय तरुणाला गावठी बनावटीच्या देशी पिस्तुलासह अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक जिवंत काडतूस असा एकूण ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद कॅम्प परिसरात आरोपींचा शोध घेत असताना, पुसद ते उमरखेड मार्गावरील तरोडा फाटा परिसरात एक संशयित व्यक्ती शस्त्र बाळगून असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयितास ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने आपले नाव शेख अरवाज शेख रोशन (वय २३, रा. कुरड, ता. पुसद, जि. यवतमाळ) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे देशी पिस्तुल अंदाजे ३० हजार रुपये किमतीचे आणि एक जिवंत काडतूस अंदाजे १ हजार रुपये किमतीचे आढळून आले.
पोलिसांनी शस्त्र जप्त करून आरोपीविरुद्ध पुसद पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी गौरव कांबळे-पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा व पुसद पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



