वाकान येथे शाळा समिती अध्यक्षपदी टोपाज चव्हाण, तर उपाध्यक्षपदी प्रशांत राठोड यांची निवड

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : तालुक्यातील मौजा वाकान येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ संपल्याने नवीन समितीची सर्वानुमते निवड करण्यात आली. मुख्याध्यापिका धोटे मॅडम, शिक्षकवर्ग व पालकांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी टोपाज चव्हाण, तर उपाध्यक्षपदी प्रशांत राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. समिती सदस्य म्हणून सौ. दुर्गा परेश नपते, आनंदराव मनवर, अविनाश राठोड, सौ. अर्पिता ईश्वर पवार, सौ. वंदना भीमराव पवार व सौ. सारीखा नवीन राठोड यांची निवड करण्यात आली.
तसेच शिक्षणप्रेमी व शिक्षण प्रतिनिधी म्हणून साहेबराव राठोड सर व सौ. छाया सुनील भगत, तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून नंदिनी प्रमोद राठोड व विवेक गजानन राठोड यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका धोटे मॅडम, शेख सर, राठोड सर, शिक्षकवृंद तसेच पालक उपस्थित होते. अध्यक्ष टोपाज चव्हाण यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही देत उपस्थितांचे आभार मानले.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



